TRENDING:

'रंग माझा वेगळा' नंतर 'या' भूमिकेत झळकणार रेश्मा शिंदे; नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज

Last Updated:

काही दिवसांपूर्वीच 'रंग माझा वेगळा' या मालिकेनं एक्झिट घेतली. त्यानंतर चाहते रेश्माला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून रेश्मा लवकरच नव्या मालिकेत झळकणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिका संपल्यानंतरही अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतात, त्यातील कलाकारही लोकप्रिय होतात. अशीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरची 'रंग माझा वेगळा'. दीपा आणि कार्तिकची ही लव्हस्टोरी चांगलीच हिट झाली होती. मालिकेनं १००० एपिसोड्सचा टप्पा पार केला होता. त्यातून दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरात पोहचली. तिने साकारलेली प्रेमळ बायको, सोशिक सून प्रेक्षकांना चांगलीच भावली. काही दिवसांपूर्वीच या मालिकेनं एक्झिट घेतली. त्यानंतर चाहते रेश्माला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून रेश्मा लवकरच नव्या मालिकेत झळकणार आहे.
 रेश्मा शिंदे
रेश्मा शिंदे
advertisement

छोट्या पडद्यावर दररोज नव्या मालिका सुरु होत आहेत. त्यात अजून एका नव्या मालिकेची झलक समोर आली आहे. स्टार प्रवाहने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून त्यात मुख्य भूमिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे झळकणार आहे. रेश्मा रंग माझा वेगळा या नंबर वन मालिकेनंतर पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. रेश्माची ही नवी मालिका कोणती आहे, त्यात ती कोणती भूमिका साकारणार आहे जाणून घ्या.

advertisement

पूनम पांडेविषयी मोठी अपडेट; अभिनेत्रीचा मृत्यू पुण्यात तर कुटुंबीय या ठिकाणी; जवळच्या मित्राचा मोठा खुलासा

रेश्मा शिंदेच्या या नव्या मालिकेचं नाव 'घरोघरी मातीच्या चुली' असं आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे जानकी रणदीवे ही भूमिका साकारणार आहे. मालिकेच्या प्रोमोनुसार रेश्मा या मालिकेत, आदर्श बायको, सगळ्यांना जीव लावणारी प्रेमळ सून अशी भूमिका साकारणार असल्याचं दिसत आहे. ही नवी मालिका नात्यांचं महत्त्व पटवून देणारी असणार आहे. रेश्माला आता या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच आतुर झाले आहेत.

advertisement

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या या प्रोमोवर अनेक कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्या असून चाहत्यांनी तिला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. आता रेश्माची ही मालिका नेमकं कधी सुरु होणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

रेश्मा शिंदेसोबत या मालिकेत सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे हे कलाकार दिसणार असल्याची माहिती आहे. तसंच सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे.

advertisement

जानकी रणदीवे या भूमिकेविषयी रेश्मा म्हणाली,"जानकी अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वत: आजी-आजोबांच्या संस्कारात वाढले. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा, किंवा स्वेच्छेने म्हणा विभक्त कुटुंब पहायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. सुख-दु:खाच्या प्रसंगात हीच नाती आपली सोबत पुरवतात. म्हणूनच नात्यांची गोष्ट सांगणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली".

मराठी बातम्या/मनोरंजन/
'रंग माझा वेगळा' नंतर 'या' भूमिकेत झळकणार रेश्मा शिंदे; नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल