पूनम पांडेविषयी मोठी अपडेट; अभिनेत्रीचा मृत्यू पुण्यात तर कुटुंबीय या ठिकाणी; जवळच्या मित्राचा मोठा खुलासा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
पूनम पांडेचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं आहे अशी माहिती आहे. त्यानंतर पुनमच्या कुटुंबीयांची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता तिच्या मृत्यूसंबंधी विविध अपडेट समोर आली असून कुटुंबीयांविषयी माहिती समोर आली आहे.
मुंबई : काल शुक्रवारी बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडेविषयी धक्कादायक बातमी समोर आली. या बातमीनं सगळ्यांनाच हादरवून सोडलं. अभिनेत्रीनं गर्भाशयाच्या कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सरनं वयाच्या 32 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला अशी माहिती समोर आली. काल सकाळीच पूनमच्या टीमनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट करत, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. अत्यंत दुःखी अंतःकरणाने जाहीर करावं लागत आहे की, पूनम पांडेचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं आहे.’ अशी माहिती दिली होती. त्यानंतर पुनमच्या कुटुंबीयांची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. आता तिच्या मृत्यूसंबंधी विविध अपडेट समोर आली असून कुटुंबीयांविषयी माहिती समोर आली आहे.
खरंतर नुकतंच समोर आलेल्या अपडेट नुसार, अभिनेत्रीचा मृत्यू गर्भाशयाच्या कॅन्सरनं नाही तर ड्रगच्या ओव्हरडोसमुळं झाला आहे. पूनम पांडेच्या जवळच्या सूत्राने अलीकडेच झूम'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मृत्यूबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत . त्यांनी म्हंटल आहे आहे, 'रिपोर्टनुसार, पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने नव्हे तर ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे झाला आहे. मात्र, अभिनेत्रीने कोणत्या प्रकारची नशा केली होती, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.'
advertisement
Poonam Pandey : आलिशान घरात राहायची, लक्झरी कारची शौकिन; पूनम पांडे इतक्या संपत्तीची होती मालकीण
त्यानंतर आता नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला. पूनम पांडेचे पार्थिव पुण्यात असून तिचे कुटुंबीय कानपूरमध्ये आहेत.तसंच आता तिचं पार्थिव पुण्यातून तिच्या गावी कानपूरमध्ये नेण्यात आलं पण अद्याप पूनमच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पूनम पांडेचा जवळचा मित्र शिवम शर्माने social_justout_hearsay या पेजशी बोलताना हा खुलासा केला आहे.
advertisement
पूनमच्या निधनाविषयी ऐकून शिवम शर्मा खूप हादरला असून अजूनही त्याचा या बातमीवर विश्वास बसत नाहीये. तिच्याविषयी बोलताना शिवम म्हणाला की, "एका कॉमन फ्रेंडने मला सांगितलं आहे की तिचं पार्थिव सध्या पुण्यात आहे तर तिचे कुटुंब कानपूरमध्ये आहे. मला माहित नाही की तिचे कुटुंबीय तिच्यावर कधी आणि कुठं अंतिम संस्कार करणार आहेत.' अशी माहिती त्यानं दिली आहे.
advertisement
पुनमचा हा मित्र लॉक अप या रियालिटी शोमध्ये तिच्यासोबत होता. तो म्हणाला की, ''मी फक्त लॉक अप गँगमधील पूनम, साईशा शिंदे आणि करणवीर बोहरा यांच्या संपर्कात होतो. तिने अलीकडेच माझ्या लग्नानंतर मला फोन करून माझं अभिनंदन केलं होतं. तिने माझ्या हनिमून विषयी देखील विचारलं होतं. तिच्या निधनाची बातमी खूप धक्कादायक आहे. माझा अजूनही विश्वास बसत नाही की ती आता या जगात नाही.''
advertisement
advertisement
शिवमने दिलेल्या या नव्या माहितीमुळं आता पुनमचं पार्थिव नक्की कुठं आहे, तिचे अंत्यसंस्कार नक्की कुठं केले जाणार असे प्रश्न उभे राहिले आहेत. मात्र याबाबत तिच्या कुटुंबियांकडून अधिकृत काहीही समोर आलेले नाही.
पूनम पांडेचं आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे. त्यानंतर आता तिच्या मृत्यूनंतरही ती चर्चेत राहिली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. पण तिच्या चाहत्यांना आता मृत्यूविषयी सत्य जाणून घ्यायचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 03, 2024 10:56 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पूनम पांडेविषयी मोठी अपडेट; अभिनेत्रीचा मृत्यू पुण्यात तर कुटुंबीय या ठिकाणी; जवळच्या मित्राचा मोठा खुलासा