भारतातील सर्वात महागडी जाहिरात
या जाहिरातीमध्ये एक्शन आहेत, गाणी आहेत. बॅालिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या जाहिरातीचं बजेट हे 150 कोटी आहे. ही जाहिरात भारतातील सगळ्यात महाग जाहिरात मानली जाते. या जाहिरातीसाठी त्यांनी VFX आणि सेटचा वापर केला आहे.
advertisement
या जाहिरातीचे डायरेक्शन एटलीने केले आहे
रिपोर्टनुसार शाहरुखच्या जवान सिनेमाचा डायरेक्टर एटली कुमारने ही जाहिरात केली आहे. बॅालिवूडच्या कित्येक मोठ्या फिल्मपेक्षा मोठा बजेट या जाहिरातीचे आहे. विकी कौशलचा छावा (130 कोटी) आणि अजय देवगनच्या रेड2 (120 कोटी) पेक्षा जास्त बजेट या जाहिरातचे आहे.
चिंग्स शेजवानची ही जाहिरात आहे. रणवीर सिंहची हटके स्टाइल दिलत आहे. तो एजेंड चिंगच्या भुमिकेत दिसत आहे. रणवीर हा 2014 पासून चिंग्स शेजवान ब्रैंड एंबेसेंडर आहे.
रणवीर सिंगच्या हिट चित्रपटांमध्ये 'बँड बाजा बारात, 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गल्ली बॉय' यांचा समावेश आहे. तर बॅाबी देओलचे सोल्जर, बादल, बिच्छू, अजनबी, हमराज़, यमला पगला दीवाना, ॲनिमल आणि वेब सिरीज आश्रम हे त्याचे फेमस सिनेमे आणि वेब सिरीज आहेत.