लग्न करून रेखा थेट हेमा मालिनीच्या घरी पोहोचली
4 मार्च 1990 रोजी मुकेश मुंबईत रेखाला भेटायला गेले होते आणि तिथेच त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. रेखाही लग्नासाठी तयार झाली. लग्नानंतर मुकेश, रेखाला घेऊन अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या घरी जाऊ इच्छित होते. परंतु रेखा तिकडे जायला तयार नव्हती. त्यानंतर दोघांनी साधेपणाने जूहू येथील एका मंदिरात लग्न केले.
advertisement
लग्नानंतरही मुकेश रेखाला दीप्ती नवल यांच्या घरी घेऊन जायचे म्हणत होते, पण रेखा आपली मैत्रीण हेमा मालिनींच्या घरी जायला इच्छुक होती. कारण रेखा आणि हेमा दोघीही दक्षिण भारतातून आलेल्या अभिनेत्री असल्याने एकमेकींच्या खूप खास होत्या.
हेमा मालिनींची रिअॅक्शन काय होती?
मुकेश यांनी पत्नी रेखाची इच्छा मान्य केली आणि ते हेमा मालिनींच्या घरी गेले. हेमा मालिनीची नजर जशी मुकेश यांच्यावर पडली तसं त्यांनी लगेचच रेखाला सांगितलं की,आता हे सांगू नकोस की तू या माणसाशी लग्न केलं आहेस.”.त्यावर रेखाने होकार दिला. मग हेमा म्हणाल्या,“तो खूप श्रीमंत आहे का?” पण रेखाने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
लग्नाच्या फक्त आठ महिन्यांनंतरच मुकेश यांनी आत्महत्या केली. तेव्हा रेखा लंडनमध्ये होती आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूला लोकांनी रेखालाच जबाबदार धरले. मात्र रेखाचं म्हणणं होतं की मुकेश यांनी आत्महत्या केल्याचा तिला मोठा धक्का बसला आणि ते असे काही करू शकतील यावर तिला विश्वासच बसत नव्हता.
