TRENDING:

Rinku Rajguru : आधी हसली मग लाजली..! बॉयफ्रेंड नको म्हणणारी रिंकू Valentines Day ला कोणासाठी झाली रोमँटीक? VIDEO

Last Updated:

Rinku Rajguru Video : बॉयफ्रेंड नको नवरा हवा म्हणणारी रिंकू राजगुरू व्हॅलेंटाईन डेला भलतीच रोमँटीक झाल्याचं दिसतंय. रिंकूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सैराट सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर रिंकूनं अनेक सिनेमात काम केलं. रिंकूच्या अपकमिंग सिनेमाची प्रेक्षकांना आतूरता आहे. रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. रिंकूच्या फोटोंना चाहत्यांची नेहमीच पसंती मिळत आलेली आहे. कोणताही सण असो किंवा इव्हेंट रिंकू सोशल मीडियावर कायम अँक्टिव्ह असते. आज तर व्हॅलेंटाईन डे... रिंकूने चाहत्यांना शुभेच्छा नाही दिल्या असं कसं होईल.
News18
News18
advertisement

गेल्या काही दिवसांपासून रिंकू राजगुरू तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. मला बॉयफ्रेंड नको नवरा पाहिजे असं रिंकूनं थेट सांगितलं. रिंकू एका मुलाखतीत म्हणाली, "मी बॉयफ्रेंड पटवणारी मुलगी नाही, डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला." रिंकूचं हे स्टेटमेन्ट चांगलंच चर्चेत आलं आहे. बॉयफ्रेंड नको नवरा हवा म्हणणारी रिंकू राजगुरू व्हॅलेंटाईन डेला भलतीच रोमँटीक झाल्याचं दिसतंय.

advertisement

( फक्त Bigg Boss मध्येच दिसते! तरी मुंबई-दुबईत कोट्यवधीचं घरं; राखी सावंत वर्षभर असं करते काय? )

Love is in the air असं म्हणत रिंकूनं व्हिडीओ शेअर केला आहे. सूर्यास्तावेळी रिंकू लाल रंगाच्या साडीत समुद्रकिनारी पळताना दिसतेय. व्हिडीओमध्ये रिंकूचा आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. आधी हसतेय, मध्येच लाजतेय. रिंकू भलतीच रोमँटिक झालेली दिसतेय. रिंकूनं या व्हिडीओसह चाहत्यांना happy valentines day म्हणत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

advertisement

रिंकूचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मात्र कमेंट केल्याशिवाय रहावलं नाही. तिच्या अनेक कलाकार मित्रांनी व्हिडीओवर हॉर्ट इमोजी शेअर केलेत. तर अनेकांनी ब्युटी इन रेड, लाल परी, सो ब्युटिफूल म्हणत रिंकूचं कौतुक केलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वय 75 अन् 50 वर्षांची साथ, पुणेरी आजी-आजोबाची जोडी जोरात, पाहा भन्नाट Love Story
सर्व पहा

रिंकूच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झाल्यास, तिचा पुन्हा एकदा साडे माडे तीन हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. पुन्हा एकदा साडे माडे तीन या सिनेमाआधी रिंकूचा आशा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमालाही प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rinku Rajguru : आधी हसली मग लाजली..! बॉयफ्रेंड नको म्हणणारी रिंकू Valentines Day ला कोणासाठी झाली रोमँटीक? VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल