TRENDING:

Nikki Tamboli: निक्की तांबोळी संतापली, धनश्री वर्माचा गेम प्लॅन केला उघड; BF अरबाजलाही झापलं

Last Updated:

Nikki Tamboli: रिअॅलिटी शोमध्ये प्रेम, वाद आणि भावनांचा खेळ पाहायला मिळतो. पण या वेळी शो “राईज अँड फॉल” मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री निक्की तांबोळीने.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रिअॅलिटी शोमध्ये प्रेम, वाद आणि भावनांचा खेळ पाहायला मिळतो. पण या वेळी शो “राईज अँड फॉल” मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री निक्की तांबोळीने. आपल्या बॉयफ्रेंड अरबाज पटेलला सपोर्ट करण्यासाठी ती पाहुणी म्हणून शोमध्ये आली होती, पण तिच्या एन्ट्रीनंतर वातावरणच तापलं. तिने धनश्रीचा गेम प्लॅन उघड केला.
 निक्की तांबोळी संतापली
निक्की तांबोळी संतापली
advertisement

शोमध्ये प्रवेश करताच निक्कीने थेट अरबाजला उद्देशून म्हटलं, 'धनश्री वर्मा ही सर्वात मोठी फसवणूक करणारी आहे! ती राईज अँड फॉल सीझन 1 मधील सर्वात नापसंत स्पर्धक आहे.' निक्कीच्या या वक्तव्यामुळे स्टेजवरच खळबळ उडाली. ती म्हणाली की, 'आता स्वतःचा मेंदू वापरण्याची वेळ आली आहे कारण कोणीही तुला सपोर्ट करत नाही.'

'कांतारा चॅप्टर 1' नंतर भारताला मिळाली नवी नॅशनल क्रश! कोण आहे रुक्मिणी वसंत?

advertisement

निक्कीने अरबाजला त्याच्या “साईड हग” विधानाबद्दलही सुनावले. ती म्हणाली, 'प्रेम व्यक्त करणे म्हणजे साईड हग देणे गरजेचं नाही. बाहेर काय चाललं आहे याची तुला कल्पनाच नाही.' अरबाज आणि धनश्रीच्या जवळिकीबद्दल निक्की नाराज असल्याचे स्पष्ट दिसले. तिच्या बोलण्यात ईर्षा, काळजी आणि राग तिन्ही गोष्टी दिसल्या.

निक्की पुढे म्हणाली, “तू तुझ्या मित्रांविरुद्ध उभा राहतोस, कारण तुला मालकी हक्काची सवय आहे. पण दहा दिवसांत असं नातं बनवणं योग्य नाही. माझं नाव तुझ्या नावाशी जोडलेलं आहे, म्हणून विचार करून वाग.” तिच्या या विधानाने शोमधील बाकी स्पर्धकही अवाक झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

निक्कीने अखेरीस अरबाजला भावनिक शब्दांत समजावलं, 'शिष्टाचार आणि आदर खेळापेक्षा वर आहेत. तू चांगला दिसत नाहीस, सगळे तुझा तिरस्कार का करत आहेत? कारण तू अपशब्द वापरतोस. लक्षात ठेव, तुझं कुटुंब हा शो पाहतं आहे.'

मराठी बातम्या/मनोरंजन/
Nikki Tamboli: निक्की तांबोळी संतापली, धनश्री वर्माचा गेम प्लॅन केला उघड; BF अरबाजलाही झापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल