रितेशने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश शुटींगसाठी युरोपला गेला होता. तिथून तो थेट बिग बॉसच्या फिनालेसाठी पोहोचला. एअरपोर्ट ते बिग बॉसचा सेट आणि शेवटी सूरजच्या हातात ट्रॉफी देण्यापर्यंतचा प्रवास या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय.
( रितेश भाऊनंतर जेनिलिया वहिनीही सूरजच्या प्रेमात, गोलीगतसाठी खास पोस्ट )
रितेशने आला आला भाऊ असं लिहिलेलं डेनिमचं जॅकेट घालून एअरपोर्टवर एंट्री घेतली. लंडनहून फ्लाइटसाठी आलो बिग बॉसच्या ग्रँड फिनालेसाठी, असं रितेश म्हणताना दिसतोय. पुढे त्याने बिग बॉसच्या मागच्या महत्त्वाचा माणूस असं म्हणत केदार शिंदे यांची ओळख करून दिली.
advertisement
व्हिडीओमध्ये पुढे रितेश फिनालेसाठी रेडी होताना दिसतोय. रितेशसाठी लॅविश तयारी करण्यात आली होती. चला जाऊया फिनाले करूया, म्हणत रितेशने बिग बॉसच्या सेटवर एंट्री घेतली आणि घरातील सगळ्या सदस्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
फिनाले संपल्यानंतर सूरजने रितेशची खास भेट घेतली. हातात ट्रॉफी घेऊन सूरजने रितेश भाऊला घट्ट मिठी मारली. रितेशने देखील सूरजला मिठीत घेऊन त्याची पाठ थोपटली आणि अभिनंदन केलं. सूरज म्हणाला, भाऊ लय बरं वाटतंय तुम्हाला भेटून. त्यावर रितेश म्हणतो,"क्या बात हैं सूरज, मला तर तुमचा लय अभिमान आहे. माझा पहिला शो आहे बिग बॉस आणि तुम्ही पहिले विनर आहात". त्यावर सूरज म्हणतो, "अहो तुम्ही आलात म्हणून मी जिंकलो. खरंच, तुम्ही आहेत म्हणून मी आहे. मला सांगितलं रितेश सर आहेत म्हणून मी शोमध्ये आलो, म्हणालो चला, झापूक झुपूक पॅटर्न दाखवू, गोलीगत". सूरजच्या या वाक्यानंतर रितेशने हसत हसत पुन्हा एकदा त्याला मिठी मारली.