संगम माहुली येथील कृष्णा नदीलगत असलेल्या ठिकाणी बुडाला हा डान्सर कलाकार बुडाला आहे. "राजा शिवाजी" चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना ही घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कलाकार बुडाल्यानंतर काही काळ रितेश देशमुखही नदीकाठी होता.
बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांची दहशतवाद्यांनी केली हत्या, काश्मीर हल्ल्यात गमावलेला जीव
घटनेनंतर काही वेळ सेटवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. रितेश देशमुख स्वतः काही वेळ नदीकाठी थांबून परिस्थितीचा आढावा घेत होता. चित्रपटाच्या टीमने तात्काळ प्रशासनाला माहिती दिली आणि स्थानिक पोलीस व आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र संध्याकाळपर्यंत कोणताही ठोस परिणाम न मिळाल्यामुळे मोहिम तात्पुरती थांबवण्यात आली. पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे अडचणी येत असल्याचे पथकाने सांगितले आहे. उद्या पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टीमकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
advertisement