'आशिकी' सिनेमा 1990 मध्ये आला. या सिनेमातील 'नजर के सामने', 'सांसो की जरुरत हे जैसे', 'दिल का आलम' या गाण्यांना त्याला रातोरात स्टार बनवले होते. या सिनेमातील गाणी अजूनही तरुण तरुणींना भूरळ टाकणारी आहेत. या गायकाच्या आवाजात एक जादू होती. ही गाणी ऐकून प्रेमात पडलेल्या लोक आपल्यातच दंग असायचे. हा गायक म्हणजे कुमार सानू. त्यांच्या हिट गाण्यांनंतर त्यांना 'किंग ऑफ मेलोडी' आणि 'रोमांस किंग' म्हणून ओळख मिळाली.
advertisement
'मुंबईत कमळ फुलणारच, मी भाजप अन् मोदींचा भक्त', महेश कोठारेंचं मोठं स्टेटमेन्ट
कुमार सानूला सलग पाच वेळा 1990-1994 मध्ये सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. या संगीताच्या क्षेत्रातील योगदानामूळे त्याला 2009 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुमार सानूच्या नावे अजून एक रेकॅार्ड आहे. त्यांनी एका दिवसात 28 गाणी रेकॅार्ड केली होती. जी सगळ्यात कठीण आहेत. त्यानंतर या रेकॅार्डचे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद केलं गेलं.
90 मध्ये कुमार सानू प्रसिद्धिच्या शिखरावर
या काळात कुमार सानूचे करियर एकदम उंचावले होते. यावेळी खूप निर्माते आणि संगीतकारांची त्याच्याकडून गाणी गाण्यासाठी रांग लागली होती. कुमार सानूला त्यावेळी 40 दिवस आंतरराष्ट्रीय टूरला जायचे होते. सानूला यावेळी स्टूडिओमध्ये हजर राहणे गरजेचे होते. देशाबाहेर जायची खबर मिळाल्यावर जेवढे निर्माते होते त्यांचे सिनेमे रखडून राहतील त्यामुळे ते सर्व सानूकडे आले. सानूने सर्वांनाच एक दिवस दिला. पण कोणतीही योजना केली नव्हती. एका दिवशी किती रेकॅार्डींग होतील तितकी करायची असे त्याने ठरवले.
सानू एक गाणं झाले की लगेच दूसरीकडे वेगवेगळ्या संगीतकार आणि दिग्दर्शकांसोबत गायला जायचा. त्याने सगळी वन टेक गाणी दिली होती. म्हणता म्हणता 28 गाणी रेकॅार्ड झाली. ते वर्ष होते 1993, या 28 गाण्यांनी 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये कुमार सानूचे नाव नोंदवले गेले. यावरुन सानूच्या गायनाचा अंदाज आपल्याला आला असेल.