TRENDING:

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं अपघाती निधन; अवघ्या 38 व्या वर्षी गमावला जीव

Last Updated:

सोशल मीडिया प्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडिया प्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर MotoTanya या नावानं ओळखल्या जाणाऱ्या तात्याना ओझोलिनाचा हीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तात्याना हीच रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात झाला तेव्हा ती बीएमडब्ल्यू बाईक चालवत होती. तात्याना ही रशियाची रहिवासी असून सोशल मीडियामुळे तिचे जगभरात चाहते होते.
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं अपघाती निधन
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं अपघाती निधन
advertisement

तात्यानाला तिच्या देशातील सर्वात सुंदर बाइकर असण्याचा मान मिळाला होता. सोशल मीडियावर तिचे 80 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेकदा ती महागड्या स्पोर्ट्स बाईक आणि कारसोबत व्हिडिओ बनवायची. आता तात्याना हीचा अपघातात मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्ध टीव्ही स्टारचा 26 व्या वर्षी मृत्यू; घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

advertisement

रशियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, तिचा अपघात तुर्कीमध्ये झाला. बाईकस्वार तात्याना एका ट्रकला धडकली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रकसोबत घडकेनंतर तिला ट्रकस्वारानं दुचाकीसह रस्त्यावर काही अंतरापर्यंत खेचत नेलं. तिची बाईक रस्त्याच्या कडेला पडलेली आढळून आली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तात्यानाचा मृत्यू झाला होता.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी तात्याना ओझोलिनासोबत इतर काही दुचाकीस्वार देखील होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तात्याना हिचं वय फक्त 38 वर्ष होतं. तिचे टिकटॉकवर 50 लाख, यूट्यूबवर 20 लाख आणि इंस्टाग्रामवर सुमारे 973000 फॉलोअर्स आहेत. ती तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध होती आणि तिने अनेकदा तिचे बाईक चालवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अलीकडेच तिला ग्रीक सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं, त्यानंतर सोशल मीडियावर लोक तिच्या समर्थनात उभे राहिले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तात्यानाला 2023 मध्ये मोटोब्लॉगर ऑफ द इयर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ऑफ द इयर हे पुरस्कार मिळाले होते. आता तात्यानाच्या आकस्मिक मृत्यूमुळे चाहते शोक व्यक्त करत असून सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं अपघाती निधन; अवघ्या 38 व्या वर्षी गमावला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल