प्रसिद्ध टीव्ही स्टारचा 26 व्या वर्षी मृत्यू; घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Last Updated:

या अभिनेत्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

हॅरी सॅवेज
हॅरी सॅवेज
मुंबई : मनोरंजनविश्वातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही स्टार हॅरी सॅवेज याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. तो लंडनच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. हॅरी सॅवेज याला 2019 मध्ये त्याला 'हंटेड' या रिॲलिटी शोमधून वेगळी ओळख मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अभिनेत्याचं लंडनमधील पुटनी येथील घर सील करण्यात आलं आहे. या अभिनेत्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच त्याच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. हॅरी फक्त 26 वर्षांचा होता. इतक्या कमी वयात झालेल्या त्याच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जातेय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या घराच्या जवळ राहणाऱ्या लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाजवळ एका व्यक्तीला अटक केली होती, मात्र तो आता जामिनावर बाहेर आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या तरुणाची ओळख उघड केलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा खून, आत्महत्या अशा विविध अंगांनी तपास करण्यात येत आहे.
advertisement
बॉलिवूडमध्ये फ्लॉप होताच अभिनेत्रीनं पाकिस्तानात जाऊन थाटला संसार; पण 2 वेळा मोडलं लग्न
हॅरीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आईचं देखील काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. तर त्याच्या वडिलांचंही वर्षभरापूर्वी निधन झालं आहे.
हॅरी हा त्याचा भाऊ फ्रँकसोबत 2019 मध्ये 'हंटेड' या टीव्ही शोद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आला. या शोनंतर, 2020 मध्ये त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. अलीकडेच तो त्याच्या काकांशी कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या वादामुळे चर्चेत होता. पण आता हॅरीच्या आकस्मिक निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जातेय. हॅरीचा मृत्यू नक्की कसा झाला हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध टीव्ही स्टारचा 26 व्या वर्षी मृत्यू; घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement