व्हिएतनामचा किनारा अन् १९७५ ची ती आठवण
श्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, सचिन पिळगांवकर व्हिएतनामच्या एका सुंदर बॅकवॉटरच्या कडेला निवांत बसलेले दिसत आहेत. डोक्यावर कॅप आणि अंगात जॅकेट अशा कॅज्युअल लूकमध्ये निसर्गाचा आनंद घेत असतानाच, अचानक सचिनजींनी आपल्या आवाजात गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ते गाणं होतं, "गीत गाता चल, गुनगुनाता चल..."
advertisement
सदाबहार गाणी अन् गौतमीचा डान्स! ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी साजरी केली हटके होळी, VIDEO
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या गाजलेल्या 'गीत गाता चल' या हिंदी चित्रपटातील हे शीर्षक गीत आहे. कित्येक दशकांनंतरही सचिनजींच्या आवाजात तोच गोडवा आणि तोच निरागसपणा अनुभवताना श्रियालाही आपला मोह आवरता आला नाही.
श्रियाने आईवडिलांसाठी प्लॅन केली ट्रिप
आपल्या आई-वडिलांसोबतच्या या प्रवासाबद्दल श्रियाने खूप सुंदर लिहिलं आहे. ती म्हणते, "माझ्या वडिलांसोबत प्रवास करताना मला सर्वात जास्त काय आवडत असेल, तर एखाद्या ठिकाणचं सौंदर्य ते गाण्यांतून कसं व्यक्त करतात हे पाहणं."
सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या लग्नाला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने श्रियाने या पॉवर कपलसाठी व्हिएतनामची ही खास ट्रिप प्लॅन केली होती. या ट्रिपमध्ये श्रियाने स्वतः टूर गाईडची भूमिका चोख बजावली.
सायकलिंग, डान्स अन् सुप्रियाजींचा स्वॅग
या सहलीचे अनेक मजेतले व्हिडिओ श्रियाने पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये सचिनजी स्वतः कॅमेरा धरून सुप्रियाजींचं शूटिंग करत आहेत, तर सुप्रियाजी एखाद्या अभिनेत्रीसारख्या दिमाखात त्यांच्याकडे चालत येत आहेत. बोटीतून फिरणं असो, व्हिएतनामच्या गल्ल्यांमधून सायकल चालवणं असो किंवा रस्त्यावर मनसोक्त डान्स करणं... पिळगांवकर फॅमिलीच्या या हॅपी मुमेंट्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
