advertisement

सदाबहार गाणी अन् गौतमीचा डान्स! ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी साजरी केली हटके होळी, VIDEO

Last Updated:

Gautami Patil: 'रंग दे कळवा' या धडाकेबाज होळी कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना गौतमी पाटील.

News18
News18
ठाणे : आज संपूर्ण देशात रंगांची उधळण होत असताना, ठाण्यातील कळवा परिसर मात्र एका वेगळ्याच ऊर्जेने रंगात न्हाऊन निघाला होता. निमित्त होतं नगरसेवक अभिजीत पवार यांनी आयोजित केलेल्या 'रंग दे कळवा' या धडाकेबाज होळी कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणारी नृत्यांगना गौतमी पाटील. गौतमी येणार म्हटल्यावर कळव्याच्या रस्त्यांवर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती, आणि गौतमीनेही आपल्या खास नृत्याविष्काराने या होळीच्या उत्सवात अक्षरशः चार चाँद लावले.

गौतमीच्या ठुमक्यांनी कळवा दणाणला

होळीचं संगीत, गुलालाची उधळण आणि समोर हजारो चाहत्यांची गर्दी... अशा वातावरणात गौतमी पाटील स्टेजवर अवतरली. 'बलम पिचकारी' आणि 'होली है' सारख्या सुपरहिट गाण्यांवर तिने सादर केलेल्या नृत्यामुळे उपस्थित तरुणाई घायाळ झाली. फक्त तरुणच नाही, तर अबालवृद्धांनीही गौतमीच्या तालावर ठेका धरला. कळव्यातील या उत्सवाने आज मुंबई-ठाण्यातील इतर सर्व कार्यक्रमांना मागे टाकलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
advertisement

जितेंद्र आव्हाडांची हजेरी अन् गौतमीचा आदर

या रंगांच्या उत्सवाला आणखी रंगत आली ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमुळे. आव्हाड साहेब स्टेजवर येताच गौतमीने त्यांचे चरणस्पर्श करून अभिवादन केले. गौतमीच्या या कृतीने उपस्थितांची मनं जिंकली. जितेंद्र आव्हाड यांनीही अत्यंत आपुलकीने गौतमीशी संवाद साधला आणि तिची विचारपूस केली.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Thane Live (@thane_live)



advertisement

एकमेकांना रंग लावत दिल्या होळीच्या शुभेच्छा

कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि गौतमी पाटील यांनी एकमेकांना गुलाल लावून होळी साजरी केली. आव्हाडांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि गौतमीला होळीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. तर, "इतक्या मोठ्या व्यासपीठावर मला संधी दिल्याबद्दल मी आमदार साहेबांची आभारी आहे," अशा शब्दांत गौतमीनेही आपली कृतज्ञता व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सदाबहार गाणी अन् गौतमीचा डान्स! ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी साजरी केली हटके होळी, VIDEO
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement