अबू धाबीमध्ये अडकलेली अभिनेत्री ईशा गुप्ता सुरक्षित भारतात परतली, पोस्ट शेअर करत सांगितली आपबीती
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशातील संघर्षाच्या काळामध्ये युएईमध्ये अडकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अखेर सुखरूप मायदेशी परतली आहे.
मुंबई: अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशांमधील वाढत्या संघर्षामुळे अनेक देशांमधील हवाई प्रवास बंद करण्यात आला होता. यामुळे जगभरातल्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. या संघर्षाच्या काळामध्ये युएईमध्ये अडकलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अखेर सुखरूप मायदेशी परतली आहे. सोमवारी, 2 मार्च रोजी ती विमानाने दिल्लीमध्ये पोहोचली. भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट लिहित त्या कठीण काळातील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नेमकं अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय, जाणून घेऊया...
शेअर केलेल्या पोस्टमध्ये ईशा गुप्ताने लिहिलंय की, मी भारतामध्ये सुरक्षित परतली आहे. भारतात परतल्यानंतर, ईशा गुप्ताने सर्वांचे आभार मानले आहे. शिवाय, तिने सर्वांसाठी प्रार्थना सुद्धा केलेली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, ती ज्या परिस्थितीत होती ती फार कठीण होती. परिस्थितीचे वर्णन करताना ईशा गुप्ताने लिहिलं की, "28 तारखेला (रविवार) मी विमानतळावर असताना हे सर्व सुरू झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत विमानतळ बंद होते आणि सर्वत्र गोंधळ उडाला होता. कारण आमच्यापैकी कोणालाही काय घडतंय हे माहिती नव्हते. त्यानंतर क्षेपणास्त्र हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पुढच्या मिनिटाला काय होईल आणि काय नाही, याची कोणालाच शाश्वती नव्हती. अनोळखी लोकं एकमेकांना धीर देत होते, प्रत्येकजण आपआपल्या कुटुंबियांना घरी फोन करत होते."
advertisement
advertisement
ईशा गुप्ताने पुढे यूएई अधिकाऱ्यांचे कौतुक करताना म्हणाली की, "मी हे सांगू इच्छिते की, मी जे पाहिले ते यूएईसारख्या देशाची ताकद होती. आम्ही अबू धाबी विमानतळावर होतो. ग्राउंड स्टाफ आणि विमानतळ सुरक्षा ताबडतोब सक्रिय झाली आणि आम्ही सर्वजण या परिस्थितीत एकत्र असतानाही शांत राहिलो. मी विमानतळामध्ये आत गेलेही नाही, म्हणून मी पुन्हा अबू धाबीमधल्या माझ्या हॉटेलमध्ये परत गेले." दरम्यान, पोस्टमध्ये ईशाने युएई सरकार आणि विमानतळ कर्मचाऱ्यांचंही कौतुक केलं आहे. अडकलेल्या प्रवाशांसाठी तात्काळ जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. शिवाय, भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांना मदत केल्यामुळे तिने भारत सरकारचेही आभार मानले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 8:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अबू धाबीमध्ये अडकलेली अभिनेत्री ईशा गुप्ता सुरक्षित भारतात परतली, पोस्ट शेअर करत सांगितली आपबीती










