advertisement

Rajya Sabha: सुप्रिया सुळे-जयंत पाटील ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, शरद पवारच राज्यसभेवर? शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स

Last Updated:

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाही महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यसभेच्या एका जागेकरिता दावा सांगत असताना शरद पवार यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत आहे. अशावेळी काँग्रेसने मात्र 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या सात जागांसाठीची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. ३ आणि ४ मार्च रोजी होळीची सुट्टी असल्याने, नामांकन दाखल करण्यासाठी फक्त ५ मार्च शिल्लक आहे. अशावेळी महाविकास आघाडीतून राज्यसभेवर कोण जाणार, याचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे.
advertisement

शरद पवार यांचे नाव निश्चित?

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार हे इच्छुक आहेत. परंतु शिवसेना पक्षाने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत चर्चेअंती शरद पवार यांच्या नावाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याची माहिती मिळते आहे.
advertisement
शरद पवार जर उमेदवार नसतील तर भारतीय जनता पक्ष सातव्या जागेवरही आपला उमेदवार देऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीने सातव्या जागेबद्दल अधिक धोका न पत्करता शरद पवारच उमेदवार असायला हवेत, अशी चर्चेही बैठकीत झाल्याची माहिती आहे.

शिवसेना काँग्रेसने पाठिंबा द्यावा, सुप्रिया सुळे यांची विनंती

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी उभय नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना आणि काँग्रेसने शरद पवार यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केली. उद्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही सुप्रिया सुळे-जयंत पाटील भेटण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajya Sabha: सुप्रिया सुळे-जयंत पाटील ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, शरद पवारच राज्यसभेवर? शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement