TRENDING:

खुर्चीत बसलेली तरुणी, बांधलेले हात अन् भयानक आवाज; सई ताम्हणकरचा नवा थ्रीलर सिनेमा, VIDEO

Last Updated:

अभिनेत्री सई ताम्हणकरचा नवा सिनेमा थ्रीलर आणि मिस्ट्री असणार आहे. सिनेमाचा काही सेकंदाचा व्हिडीओ नुकताच रिलीज झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाची ताकद दाखवून देत आहे. पण मराठीशी जोडलेली तिची नाळ कायम आहे. येत्या काही महिन्यात सई एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा थ्रीलर आणि मिस्ट्री असणार आहे. सिनेमाचा काही सेकंदाचा व्हिडीओ नुकताच रिलीज झाला आहे.
News18
News18
advertisement

बोल बोल राणी असं सईच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. सिनेमाच्या प्रोमोमध्ये खुर्चीत बसलेली एक तरुणी, बांधलेले हात, पार्श्वभूमीला घोंगावणारं रहस्यमयी संगीत आणि बंदुकीतून सुटलेली गोळी… या सगळ्यामुळे नेमकं घडलंय तरी काय? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. अस्वस्थ करणारी शांतता आणि थरारक वातावरण पाहून सिनेमा नक्कीच इंट्रेस्टिंग असल्याचं कळतंय.

advertisement

( ईशा डेच्या लग्नात भाव खाऊन गेले समीर चौघुले! त्या कृतीने वेधलं लक्ष; नेमकं काय करत होते? पाहा PHOTO )

या सिनेमाच्या निमित्तानं तब्बल 15  वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांच्यासोबत संभाजी ससाणेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

advertisement

व्हिडीओमध्ये दिसणारी मुलही नेमकी कोण? तिचे हात का बांधलेले आहेत? गोळी कुणासाठी आहे? आणि या सगळ्यामागे कोणतं सत्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं 10 जुलैला मिळणार आहे. 10 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

चित्रपटाबद्दल निर्माते, दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, ''थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. ‘बोल बोल राणी’चा हा व्हिडीओ या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावं."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याला नवी SUV घेताय! मग Tata Punch EV ठरेल बेस्ट ऑप्शन, पेट्रोल भरण्याचं टेन्शनच नाही
सर्व पहा

सिनेमाला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आहे. रहस्यमयी कथानक, तगडी स्टारकास्ट आणि वेगळ्या मांडणीमुळे 'बोल बोल राणी' हा सिनेमा थिएटर गाजवेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
खुर्चीत बसलेली तरुणी, बांधलेले हात अन् भयानक आवाज; सई ताम्हणकरचा नवा थ्रीलर सिनेमा, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल