भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशुमखनं तन्वी कोलते किती बोलते! असं सुनावलं होतं. तर रुचिता बोलायला लागली की प्रेक्षक आवाज म्युट करतात, असंही सांगितलं होतं. रितेशनं हे सांगितल्यानंतर दोघींनी त्यांच्यात काहीही सुधारणा केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षक अजूनही त्यांना वैतागलेले आहेत. घरातील सदस्यांपासून ते प्रेक्षकांपर्यंत अनेक जण त्यांच्या आवाजाला कंटाळल्याचं सोशल मीडियावर बोलत आहेत.
advertisement
पण तुम्ही तन्वी आणि रुचिताचं काय घेऊन बसलात, यापूर्वीही बिग बॉसच्या घरात एका स्पर्धकाचा आवाज एवढा गाजला होता की थेट सलमान खानने तेव्हाचे होस्ट महेश मांजरेकर यांना फोन केला होता. ती स्पर्धक म्हणजेच तृप्ती देसाई. त्या बिग बॉस मराठी 3 मध्ये सहभागी झाल्या होत्या.
तृप्ती देसाईंनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा किस्सा सांगितला. त्यांनी लिहिलं की, "बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून सलमान खान यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता."
तृप्ती यांनी बिग बॉसच्या चावडीचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. महेश मांजरेकर म्हणाले होते, "सलमानचा फोन आला मला. त्यांच्या सेटवरचे सगळे कॉन्टेस्टंट सकाळी कोणाला चहा द्यायचा आहे असं विचारत होते. कोणाचे पाय चेपायचे आहेत कोणाचं काय करायचं आहे. सलमान म्हणाला, हे लोक पागल झालेत का? त्याने सांगितलं की, आदेश येतायत एका बाईचे, मोठ मोठ्याने. चहा कुठेय माझा, हे कुठेय माझं... तृप्ती तुमचा आवाज ऐकून तिकडच्या सेटवरचे काम करत होते. कारण इथे बाजूलाच आहे ना तो सेट.
तृप्ती देसाई म्हणाल्या, "हो सर गेला असेल. मला हुकूमशाहची पदवी मिळाल्यामुळे माझा आवाज मला त्या पट्टीत ठेवता आला." मांजरेकर म्हणाले, "हुकूमशाह म्हणजे आरडा ओरडा नाही ना. तो हुकुम क्या शाह झाला." दरम्यान महेश मांजरेकर यांनी हा संपूर्ण सीन मिश्किलमध्ये सांगितला होता.
