बिग बॉस 19च्या विकेंड का वारला सलमान खानने सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली. त्याचबरोबर काही मजेदार क्षणीही पाहायला मिळाले. विकेंडला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तलचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. तान्याला एखाद्या राजकुमारी सारखी ट्विटमेन्ट देत तिचा दिवस आणखी स्पेशल बनवला. शोमध्ये मिळालेल्या या सरप्राइजनं तान्या खूप आनंदी दिसली.
advertisement
वीकेंड का वारमध्ये सलमान खानने तान्याला एक गिफ्ट दिलं. तो म्हणतो, "अरे... ओह... ओह... बॉसचा वाढदिवस आहे. तान्या, बिग बॉस टीमने तुझ्यासाठी काहीतरी खास पाठवलं आहे." यानंतर अभिषेक बजाज आणि शाहबाज बादशाह तिच्यासाठी गिफ्ट्स घेऊन येतात. अभिषेक तिला सांगतो की हा दुबईचा बकलावा आहे. त्यावर तान्या म्हणते, "मला आशा आहे की तो खरंच दुबईचा आहे." यावर सलमान मजेत उत्तर देतो, "नाही, तो दुबईचा आहे, दंडाच्या थोडे आधी."
सलमान खान तिला विचारतो, 'तान्या तू किती वाजता जन्माला आली होती.' तान्या म्हणते, 'सर 2:54 PM.' सलमान म्हणतो, 'मला हेच जाणून घ्यायचं आहे की, का? कशासाठी?' त्यावर तान्य हसत उत्तर देत म्हणते, 'कारण मी तुम्हाला भेटू शकेन. तुमच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मी 30 वर्ष वाट पाहिली आहे.' सलमान तिला विचारतो, 'तू कधीपासून हे स्वप्न बघतेस.' 'सर जेव्हापासून तुम्हाला हम साथ साथ हैं मध्ये पाहिलं आहे तेव्हापासून', असं तान्या म्हणते. सलमान तिला विचारतो, 'तेव्हा तू किती वर्षांची होतीस?' तान्या सांगते, '10-11 वर्षांची असेन.' सलमान तिला म्हणतो, 'तू जरा लवकरच स्वप्न बघायला घेतलीस.' तान्या सलमानला म्हणते, 'सर चूक तुमचीही आहे. तुम्ही त्यात इतके हँडसम का दिसत होते.' सलमान म्हणतो, 'हा बरोबर, मेरी गलती,मला माफ करा.'
'राणीसाहेब तुमचा बर्थडे आहे. तर सेलीब्रेशन धामधुमीत झालं पाहिजे. हुकूम सोडा की तुम्ही या शोमध्ये कोणाकडून काय करून घेऊ इच्छिता', असं सलमान तिला विचारतो. त्यावर नात्या सांगते, 'सर आधी तुमच्याकडून एक गिफ्ट मागेन.' सलमान म्हणते, 'आधी ते गिफ्ट काय आहे त्यावर डिपेंड करतं हा की नाही.' तान्या म्हणते, 'प्लिज नाही बोलू नका, नाहीतर मला बर्थडेच्या दिवशी रडावं लागेल.' सलमान म्हणतो, 'हो आणि मला खूप फरक पडेल.' त्यावर घरात एकच हशा पिकतो.
तान्या म्हणते, 'मी तुमच्याकडे एक गोष्ट मागते की, आपली स्वप्न पूर्ण करत करत, सगळ्यांशी लढत मी मुंबईत आली आहे. इथे मला खूप भीती वाटते कारण इथे माझी फॅमिली नाहीये. मी फॅमिलीपासून खूप दूर आहे.' त्यावर सलमान तिला विचारतो, 'मग तुला मला तुझ्या परिवाराचा भाग बनवायचं आहे?' तान्य म्हणते 'हा.' त्यावर सलमान तिला सांगतो, 'आजकाल मॅडम माझी जी हालत आहे, जे जे माझ्यासोबत अटॅच होत आहेत आणि एक अटॅच झाले होते, मेरे साथ उनकी भी बज रही हैं ( माझ्यासोबत तेही धोक्यात आहे )