TRENDING:

'मी घरातही सुरक्षित नाही...' सलमानची EX घाबरली, मागितला बंदुकीचा परवाना

Last Updated:

बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी सध्या चिंतेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या पुण्यातील फार्महाऊसवर झालेल्या दरोड्यानंतर आणि तोडफोडीनंतर, ती आता स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी सध्या चिंतेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या पुण्यातील फार्महाऊसवर झालेल्या दरोड्यानंतर आणि तोडफोडीनंतर, ती आता स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर झाली आहे. अलीकडेच तिने बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे आणि पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भीती व्यक्त केली आहे.
 सलमानची EX घाबरली, मागितला बंदुकीचा परवाना
सलमानची EX घाबरली, मागितला बंदुकीचा परवाना
advertisement

जुलै महिन्यात घडलेल्या या घटनेत काही अज्ञात लोकांनी तिच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश करून मोठी हानी केली होती. त्यांनी रेफ्रिजरेटर, टीव्ही, फर्निचर यासारख्या वस्तू फोडल्या आणि घरातील भिंतींवर अश्लील चित्रे काढली. इतकंच नव्हे तर 50,000 रोख आणि 7000 किमतीचा टीव्हीही चोरला गेला. या घटनेमुळे अभिनेत्री हादरली होती. फार्महाऊसभोवती लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले गेल्याने ही कृती पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

advertisement

अभिषेकचा स्पेशल मोमेंट, आई, बहिण सगळेच उपस्थित पण पत्नी ऐश्वर्याच MISSING; पाहा VIDEO

संगीता बिजलानीने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनेनंतर जवळपास तीन महिने उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. अभिनेत्री म्हणाली, "मी गेल्या 20 वर्षांपासून या फार्महाऊसमध्ये राहत आहे, पण आता मला माझ्याच घरात सुरक्षित वाटत नाही."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

अलीकडेच तिने पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांची भेट घेतली आणि प्रकरणाच्या तपासात गती आणण्याची मागणी केली. तिचा बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज सध्या प्रक्रियेत आहे. या घटनेनंतर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिच्याबद्दल सहानुभूती आणि समर्थन व्यक्त केले आहे. संगीता सध्या मुंबईत असून, ती पुन्हा फार्महाऊसमध्ये जाण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्याचा विचार करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी घरातही सुरक्षित नाही...' सलमानची EX घाबरली, मागितला बंदुकीचा परवाना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल