TRENDING:

Samantha-Raj Marriage: लग्नानंतर पहिल्यांदाच नवऱ्यासोबत कॅमेऱ्यासमोर आली सामंथा; पांढऱ्या साडीतील साउथच्या क्वीनच्या लूकने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Last Updated:

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरू हे 13 डिसेंबर 2025 रोजी हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाले. लग्नानंतर या जोडी पहिल्यांदाच अशा प्रकारे एकत्र दिसल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीची 'क्वीन' सामंथा रुथ प्रभू लग्नानंतर काय करतेय, कुठे जातेय? कोणता सिनेमा करणार आहे? यासगळ्याकडे तिच्या फॅन्सचं लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून सामंथाच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि अखेर तिने गुपचूप लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी सार्वजनिकरीत्या एकत्र दिसली आणि सोशल मीडियावर फोटोंचा पाऊस पडू लागला आहे.
सामंथा रुथ प्रभू  आणि राज निदिमोरू
सामंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू
advertisement

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरू हे 13 डिसेंबर 2025 रोजी हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाले. लग्नानंतर या जोडी पहिल्यांदाच अशा प्रकारे एकत्र दिसल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.

हैदराबादमधील एका कार्यक्रमासाठी ही जोडी पोहोचली होती. यावेळी 'नवी नवरी' सामंथाचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. तिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. हलका मेकअप, अर्धवट बांधलेले केस आणि चेहऱ्यावरील स्माइल तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत होतं. दुसरीकडे, राज निदिमोरू यांनी ब्लॅक टी-शर्ट, पॅन्ट आणि तपकिरी रंगाच्या जॅकेटमध्ये अगदी साध्या पण रुबाबदार अंदाजात हजेरी लावली.

advertisement

सामंथा आणि राज यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी कोईम्बतूर येथील 'ईशा योग केंद्रात' एका खाजगी 'भूत शुद्धी' विवाह सोहळ्यात एकमेकांशी लग्न केलं. या लग्नाची गुप्तता इतकी पाळली गेली होती की, केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच या सोहळ्याला उपस्थित होते. 'द फॅमिली मॅन 2' च्या सेटवर या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर 'सिटाडेल: हनी बनी' मध्ये काम करताना त्यांच्यातील जवळीक वाढली.

advertisement

विमानतळावरील या जोडीचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "आनंदाने भरलेली नवीन सुरुवात," अशी दाद चाहते देत आहेत. राज यांचा शांत स्वभाव आणि सामंथाची ऊर्जा यामुळे ही जोडी इंडस्ट्रीतील नवीन 'पॉवर कपल' ठरत आहे. दोघांनीही आपलं नातं अनेक महिने खाजगी ठेवलं होतं, मात्र आता ते उघडपणे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 10 लाख रुपयांचा पेन, पुणेकरांसाठी मोफत प्रदर्शन, कधी आणि कुठं पाहता येणार?
सर्व पहा

लग्नानंतरही सामंथा कामात व्यस्त आहे. ती लवकरच 'मां इंटी बंगारम' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे दिग्दर्शन बी.व्ही. नंदिनी रेड्डी करत आहेत, तर खुद्द राज निदिमोरू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'ओह! बेबी' या सुपरहीट चित्रपटानंतर सामंथा आणि नंदिनी रेड्डी यांची जोडी पुन्हा एकदा कमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Samantha-Raj Marriage: लग्नानंतर पहिल्यांदाच नवऱ्यासोबत कॅमेऱ्यासमोर आली सामंथा; पांढऱ्या साडीतील साउथच्या क्वीनच्या लूकने वेधलं सगळ्यांचं लक्ष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल