'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरच्या ऑन-स्क्रीन पत्नीची भूमिका गीतांजलीची भूमिका करणाऱ्या रश्मिका मंदान्ना हिने साकारली होती. मात्र, रश्मिका ही दिग्दर्शक संदीपची पहिली पसंती नव्हती अशी माहिती समोर आली. रश्मिका ऐवजी चित्रपटात बॉलिवूडची दुसरीच अभिनेत्री दिसली असती. पण ऐनवेळी तिला रिप्लेस करून चित्रपटात रश्मिकाची एंट्री झाली. आता त्याविषयी संदीप रेड्डी वांगांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
'हे यश पाहून कलाकार म्हणून त्रास होतो...' 'त्या' भूमिकेविषयी उपेंद्र लिमयेनी व्यक्त केली खंत
संदीप रेड्डी जेव्हा 'अॅनिमल' बनवत होते, तेव्हा त्यांनी गीतांजलीच्या भूमिकेसाठी रश्मिका नाही तर परिणीती चोप्राला कास्ट केलं होतं. पण शेवटच्या क्षणी त्यांनी परिणीतीला रिप्लेस केलं. नुकताच संदीपने याविषयी खुलासा केला आहे. कोमल नाहटा यांना दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'खरंतर ती माझीच चूक आहे. मी तिला म्हणाली, 'शक्य असेल तर मला माफ कर.' मी तिला दीड वर्षांपूर्वी साइन केले होते, पण शूटिंगच्या आधी काही कारणामुळे मला तिच्यात गीतांजलीची झलक दिसली नाही. काही भूमिका काही लोकांना सूट करत नाहीत.' असा खुलासा त्यांनी केला.
संदीप रेड्डी वंगा यांनी पुढे सांगितले की परिणीतीने आपला निर्णय सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दलही खुलासा केला आहे. संदीप म्हणाले, 'मी ऑडिशनवर कधीच विश्वास ठेवत नाही. माझा फक्त माझ्या इच्छेवर विश्वास आहे. पहिल्या दिवसापासूनच मी परिणितीच्या अभिनयाचा चाहता आहे. मला कबीर सिंगमध्येही प्रितीच्या भूमिकेत तिला कास्ट करायचं होतं, पण तेव्हाही ते घडू शकलं नाही. मला नेहमीच तिच्यासोबत काम करायचं होतं.'
संदीप रेड्डी पुढे म्हणाले, तिला हे माहिती आहे. मी तिला म्हणालो, 'सॉरी. माझ्यासाठी चित्रपटापेक्षा मोठं काहीही नाही. त्यामुळे मी माझा निर्णय बदलून दुसऱ्या कलाकाराला कास्ट करत आहे. तिला वाईट वाटलं, पण मी असं का म्हणतोय हे तिने समजून घेतलं.' असं ती म्हणाली.
प्रितीची भूमिका शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंह' या चित्रपटात कियारा अडवाणीने साकारली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेला संदीपचा हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.