जरीन खान यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं आहे. डॉक्टरांनी कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. जरीन खान यांनी मृत्यूच्या तीन महिने आधी म्हणजेच जुलै महिन्यात त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. मुलगी सुजैन खानने त्यांचे कँन्डिड फोटो शेअर केले होते.
advertisement
जरीन खान यचा बॉलिवूडच्या प्रसिद्ध घरातून होत्या. प्रसिद्ध अभिनेते संजय खान हे त्यांचे पती होते. अभिनयाबरोबरच जहीरन खान या प्रसिद्ध डिझाइनरही होत्या. कुकबुकच्या लेखिका होत्या. त्यांचा जन्म 12 जुलै 1944 साली एका बंगळुरू पारसी कुटुंबात झाला होता. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं नाही. शाळेनंतर त्यांनी क्रिएटिव्ह आणि बिझनेस वर्ल्डमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
1960 च्या दशकात त्यांनी इंडस्ट्रीत डेब्यू केला. 1963 साली त्यांनी तेरे घर के सामने या सिनेमातून डेब्यू केला. तीन वर्षांनी 1966 त्यांनी अभिनेते संज खान यांच्याशी लग्न केलं. त्यांना सुजैन खान, सिमॉन अरोरा, फराह अली खान आणि जायद खान अशी मुलं आहेत. सुजैन खान हिने अभिनेता ऋतिक रोशनशी लग्न केलं. राकेश रोशन आणि संजय खान हे फॅमिली फ्रेंड्स आहेत. पण ऋतिक आणि सुजैन यांचा संसार काही वर्षात मोडला. सुजैन आता तिच्या बॉयफ्रेंडबरोबर तर आणि ऋतिक त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर दिसतो.
