सुलक्षणा पंडितची अधुरी कहाणी! बॉलिवूडच्या या हिरोवर करत होती प्रेम, लग्न नाही झालं तर आयुष्यभर राहिली सिंगल

Last Updated:
Sulakshma Pandit : अभिनेत्री सुलक्षणा पंडित अधुरी कहाणी संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. प्रसिद्ध अभिनेत्यावर त्यांचं प्रेम होतं. नकारानंतर त्या आयुष्यभर सिंगल राहिल्या.
1/9
दिग्गज कलाकारांच्या अचानक निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवू़डची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

advertisement
2/9
सुलक्षणा यांचा भाऊ प्रसिद्ध संगीतकार ललित पंडित यांनी सुलक्षणा यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

3/9
ललित पंडित यांनी सांगितलं की, सुलक्षणा 6 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.  7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे.

4/9
सुलक्षणा पंडित यांचा जन्म 1954 मध्ये रायगड (छत्तीसगड) येथे एका प्रतिष्ठित संगीत घराण्यात झाला. त्या महान शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची आहेत. त्यांचे भाऊ जतिन-ललित हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आहेत.

5/9
1975 मध्ये आलेल्या संकल्प सिनेमात
1975 मध्ये आलेल्या संकल्प सिनेमात "तू ही सागर है तू ही किनारा" हे गाणं सुलक्षणा यांनी गायलं होतं. या गाण्यासाठी सुलक्षणा यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. इतकंच नाही तर "सात समंदर पार से" हे त्यांचं गाणं सुपरहिट ठरलं. 'उलझन' या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.
advertisement
6/9
बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींची नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडली जातात. सुलक्षणा यांनी राजेश खन्ना, जितेंद्र, विनोद खन्ना,  शशी कपूर सारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.

7/9
अभिनेत्री सुलक्षणा यांचं नाव संजीव कुमार यांच्याबरोबर जोडलं गेलं होतं. सुलक्षणा यांनी उलझन या त्यांच्या पहिल्या सिनेमात अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत काम केलं होतं. याच सिनेमावेळी सुलक्षणा या संजीव कुमार यांच्या प्रेमात पडल्या.

8/9
सुलक्षणा यांनी संजीव कुमार यांना लग्नाची मागणी घातली होती. पण त्यांनी नकार दिला. त्या नकारानंतर सुलक्षणा यांना धक्का बसला, त्यांनी पुढे लग्न नाही.

9/9
1985 मध्ये संजीव कुमार यांचं निधन झालं. त्यानंतर सुलक्षणा यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणं पसंत केलं. आज सुलक्षणाही आपल्यात नाहीत. यावेळी एक गोष्ट प्रखर्षाने लक्षात आली ती म्हणजे संजीव कुमार यांचं निधन 6 नोव्हेंबर 1985 रोजी झालं. त्यांच्या पुण्यतिथीच्याच दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुलक्षणा पंडित यांनीही जगाचा निरोप घेतला.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement