RatnaShastra: ऑफिस अन् तिथलं राजकारण नकोसं झालंय? या 5 पैकी एक रत्न धारण केल्यानं जादू पाहाल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
RatnaShastra Marathi: रत्नशास्त्रानुसार काही विशिष्ट रत्ने धारणं केल्यानं अनेक अडचणींमधून सुटका मिळू शकते. रत्न धारण करण्याचा अनेकांना लाभ होऊ शकतो. राशीनुसार आणि इतर गोष्टींचा विचार करून रत्नाचा वापर केल्यास त्याचा फायदाच दिसून आला आहे. तुमचा मानसिक ताण वाढला असेल, किंवा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल, किंवा ऑफिसच्या वातावरणामुळे तुम्हाला मानसिक ताण येत असेल तर तुम्ही तुमच्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार काही विशिष्ट रत्ने घालण्याचा विचार करावा. या रत्नांचा मनावर खोल आणि सकारात्मक परिणाम होतो. अशा पाच रत्नांबद्दल जाणून घेऊया, ते मानसिक ताण कमी करू शकतात किंवा रागाची स्थिती कमी करण्यास मदत करतात.
advertisement
advertisement
अमेथिस्ट रत्न - अ‍ॅमेथिस्ट रत्नाला जामुनिया असंही म्हणतात, असं म्हटलं जातं की तो एखाद्याच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करतो आणि त्यानं सर्व कामे यशस्वी होतात. ते मानसिक शांती आणि एकाग्रता वाढवणारं रत्न मानलं जातं. धारण करणाऱ्याला शनि दोषापासून मुक्ती मिळते. ऑफिसमध्ये मनःशांती राहते आणि सर्व कामे यशस्वी होतात. खांदे आणि पाठीच्या कण्यातील समस्या दूर होतात.
advertisement
advertisement
लेपिडोलाइनट - लेपिडोलाइनट रत्न राग शांत करण्यास मदत करतं. जे लोक हे रत्न धारण करतात त्यांना तणाव कमी होऊन कामावर नीट लक्ष देण्यास फायदा मिळतो, मानसिक शांती मिळते. लेपिडोलाइनट जांभळ्या रंगाचा असतो आणि तो धारण केल्यानं अनावश्यक राग आणि ताण-तणावात माणूस येत नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


