अभिनेत्री हिमानी शिवपुरी अलीकडे रेड एफएमच्या पॉडकास्टवर दिसल्या. त्या म्हणाल्या की त्यांनी ऐश्वर्यासोबत "आ अब लौट चलें", "हमारा दिल आपके पास है" आणि "उमराव जान" मध्ये काम केले आहे. त्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान त्यांनी सलमान-ऐश्वर्याच्या नात्याचे अनेक प्रसंग जवळून पाहिले.
'प्रचंड वेदना, खूप त्रास व्हायचा', सलमान खानला गंभीर आजार, अनेक वर्षांपासून देतोय झुंज
advertisement
हिमानी सांगतात, "एकदा आम्ही हैदराबादमध्ये शूट करत होतो. तेव्हा सलमान खान दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला सेटवर यायचा आणि सकाळी निघून जायचा. त्यावेळी दोघं खूप जवळचे मित्र होते." त्या पुढे म्हणाल्या, 'एकदा ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत शूट करत होती. त्यावेळीही सलमान माझ्याकडे आला होता आणि म्हणाला, ‘काय आहे ते? तिला समजावून सांग. वहीदा रहमानकडे बघ... पण हिला वाटतं की ती खूप सुंदर आहे.' मी त्याला शांत राहायला सांगितलं.'
हिमानीने ब्रेकअपबद्दलही मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "मलाही कारण माहिती नाही. पण कदाचित त्यांच्यात काही जमलं नसेल. नातं तुटलं आणि दोघं वेगवेगळ्या वाटेने निघाले." आज सलमान अविवाहित आहे, तर ऐश्वर्या राय बच्चन अभिषेक बच्चनसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. तरीसुद्धा, त्यांची जुनी प्रेमकहाणी आणि त्यातील किस्से अजूनही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.