TRENDING:

राधिका आणि अनंत अंबानी Pre Wedding कार्यक्रमासाठी शहारुखची तयारी, प्रॅक्टिसवरुन परत येतानाचा Video

Last Updated:

कार्यक्रमाची तयारी करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी शाहरुख खानने गुजरातमधील जामनगरला भेट दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी त्यांच्या साखरपूडा पार पडला आणि आता त्यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्यासाठी शाहरुख खानने गुजरातमधील जामनगरला भेट दिली.
राधिका आणि अनंत अंबानी यांच्या Pre Wedding कार्यक्रमासाठी शहारुखची तयारी
राधिका आणि अनंत अंबानी यांच्या Pre Wedding कार्यक्रमासाठी शहारुखची तयारी
advertisement

गुरुवारी, 22 फेब्रुवारी रोजी मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी जामनगरमध्ये एक दिवस घालवला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान जामनगर विमानतळावर मुंबईला जाणाऱ्या विमानात बसण्यासाठी एन्ट्री करताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचं जाकेट घातलं होतं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाहपूर्व उत्सव 1 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

advertisement

''1-3 मार्च, 2024 या कालावधीत जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्स येथे राधिका आणि अनंत यांच्या लग्नापूर्वीच्या उत्सवात तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे. 1997 मध्ये, रिलायन्सने जामनगरजवळ जगातील सर्वात मोठे ग्रासरूट रिफायनिंग कॉम्प्लेक्स बांधले. वर्षानुवर्षे, या रखरखीत प्रदेशात 10 दशलक्षाहून अधिक झाडे लावली आणि त्याचे रूपांतर हिरव्यागार समुदायात झालं. फुले आणि फळांनी भरभराट आणि आशियातील सर्वात मोठी आंब्याची बाग! या उपक्रमाचा आत्मा पुढे नेत अनंतने या संकुलाचे प्रेमाने सुटका केलेल्या हजारो प्राण्यांसाठी काळजी आणि करुणेचे आश्रयस्थान बनवले आहे,'' असे निमंत्रणात म्हटलं आहे.

advertisement

''गेल्या 25 वर्षांमध्ये आम्ही जामनगरमध्ये आमच्या सर्वात सुंदर आठवणी बांधल्या आहेत आणि ते आमच्या हृदयाच्या सर्वात जवळचे ठिकाण आहे. आम्ही राधिका आणि अनंतच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात साजरी करत असताना तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्ही आनंदी आहोत! एका अविस्मर्णीय विकेंडसाठी तुम्ही ही तारीख लक्षात ठेवा. आम्ही तुमचं आमच्या घरी, जामनगरमध्ये स्वागत करण्यासाठी यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही. मनापासून, नीता आणि मुकेश अंबानी,'' अशी निमंत्रण पत्रिका गेस्टला पाठवली गेली आहे.

advertisement

अनंत आणि राधिका 19 जानेवारी, 2023 रोजी मुंबईत गोल धना कार्यक्रमामध्ये (साखरपूडा) एकमेकांची झाले. गोल धना म्हणजे धणे आणि गूळ, जे समारंभात पाहुण्यांना वाटले जाते. गुजराती लग्नात, समारंभ एक प्रतिबद्धता दर्शवतो. वधू आणि तिचे कुटुंब मिठाई आणि भेटवस्तू घेऊन वराच्या घरी पोहोचतात. त्यानंतर जोडपे लग्नाच्या अंगठीची देवाणघेवाण करतात आणि प्रत्येक कुटुंबातील पाच विवाहित महिलांकडून आशीर्वाद घेतात.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
राधिका आणि अनंत अंबानी Pre Wedding कार्यक्रमासाठी शहारुखची तयारी, प्रॅक्टिसवरुन परत येतानाचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल