कपूर घराण्यातील एक सुपरस्टार, दिग्गज अभिनेते शम्मी कपूर, ज्यांनी 1950 ते 1970 च्या दशकात खूप हिट सिनेमे दिले. त्यांचा त्याकाळात कोणीच स्पर्धक नव्हता. त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगवेगळ्या भूमिका या अजरामर केल्या आहेत. त्यांच्या अभिनयात एक जोश आणि ऊर्जा असायची. शमी कपूर यांचे प्रेमप्रकरण कायमच चर्चेचा विषय असायचा. परंतु त्यांच्या लव लाइफ बद्दल फारसे कोणाला माहिती नाही.
advertisement
'शोले'मधील जेलरची भूमिका अजरामर करणाऱ्या असरानी यांचे निधन, 84 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
शम्मी कपूर यांचे पहीले प्रेम
शम्मी कपूर यांचे शेजारी त्यांचे पहीले प्रेम नूतन होते. ते दोघंही एकत्रच लहाणाचे मोठे झाले. त्यांच्या दोघांच्याही कुटूंबाचे जवळचे चांगले संबंध होते. त्यामूळे शम्मी आणि नूतन यांचे नाते अजून घट्ट झाले. मोठे झाल्यावर त्यांनी लग्न करायचे ठरवले, पण नूतन यांचे आई-वडील यांच्या वैयक्तिक वादामूळे ते वेगळे झाले. तिची आई सामर्थ हिने तिचे मित्र मोतीलाल यांच्या सांगण्यावरुन शम्मी-नूतनच्या लग्नाला नकार दिला. त्यानंतर नूतन यांना शिक्षणासाठी स्वित्झर्लेंडला पाठवले गेले. तेव्हाच शम्मी यांच्या प्रेमाचा शेवट झाला.
शम्मी आणि नादिया यांच्या प्रेमाची गोष्ट
शम्मी एकदा आपल्या भावांसोबत श्रीलंका फिरायला गेले होते. एका हॅाटेलमध्ये ते थांबले होते. तेव्हा त्यांची ओळख 17 वर्षाच्या नादिया यांच्याशी झाली. ते तिच्या प्रेमात पडले होते. शम्मी यांना तिला प्रपोज केले. नादिया हिने त्यांना पाच वर्ष थांबायला सांगितले. त्या बोलल्या शम्मींना की, आपले नाते घट्ट राहीले तर भविष्यात आपण लग्नाचा विचार करुया. नादिया मुंबईत आल्या आणि शम्मी शूटिंगमध्ये व्यस्त झाले. त्याकाळी संपर्काच्या सुविधा नसल्याने त्यांच्या या ही प्रेमाचा शेवट खराब झाला.
शम्मी आणि गीता यांचे प्रेम
शम्मी आणि गीता यांची 1955 मध्ये ‘रंगीन रातें’ या सिनेमाच्या सेटवर ओळख झाली. याची शूटींग कुमाऊ मध्ये झाली होती. तेव्हा शम्मी आणि गीता दोन आठवडे एकत्र होते. 23 ऑगस्ट 1955 मध्ये गीता यांनी शम्मींकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुंबईत लग्न केले. या लग्नाला फक्त पुजारी हरी वालिया हे एकच व्यक्ती पुरावे होते. गीतांनी शम्मींना एकदा पर्स मधून लिपस्टिक काढून माझ्या मस्तकाला लावा असे सागितले होते. शम्मी आणि गीता यांना दोन मुलं झाली, एक आदित्य आणि दुसरी कांचन.