शर्मिला टागोर नवरा उठण्यापूर्वी मेकअप का करत असे?
सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सोनाक्षी सिन्हा सहभागी झाली होती. या दरम्यान तिने प्रेम आणि नातेसंबंधांविषयी खुलेपणाने चर्चा केली. सैफ अली खानची बहीण सोहा म्हणाली,"मी कुणाल खेमूसमोर मेकअपशिवाय खूपच कम्फर्टेबल असते. पण माझ्या आईने मला एकदा सांगितले होते की जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा त्या पप्पांच्या आधी उठून हलका-फुलका मेकअप करायच्या." सोहाने पुढे हे देखील सांगितले की शर्मिला असे का करत असत. ती म्हणाली,"मेकअप केल्यानंतर त्या पुन्हा झोपायच्या, कारण त्यांना वाटायचे की त्या शर्मिला टागोर आहेत आणि उठल्यानंतर पप्पा त्यांनाच पहिले पाहावेत."
advertisement
सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया व्हायरल
सोनाक्षी सिन्हा म्हणाली,"तुम्हाला खरंच वाटतं का की गोष्टी अशा प्रकारे घडतात? आकर्षणासाठी प्रेम आणि समर्पण आवश्यक असतं. मी खरंच या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. हे फक्त लुक्सवर अवलंबून नसतं. मला नेहमी जाणवतं की मी कशामुळे आकर्षित होते. व्यक्ती जसा आहे तसाच, आणि तो मला कसं फील करून देतो… ते महत्त्वाचं आहे."
सोनाक्षी सिन्हाने सांगितली पती जहीरची खासियत
बॉलिवूड अभिनेत्री पुढे म्हणाली,"तो असा माणूस आहे, ज्याने मला नेहमी आत्मविश्वास दिला आहे. मी कशीही दिसत असले तरी. तो माझे सर्वात वाईट फोटो काढतो आणि मी कारण विचारलं तर तो म्हणतो… त्या क्षणी तू मला खूप सुंदर दिसतेस".
