मंदार देवस्थळी यांनी आज पैसे देतो असं सांगितलं होतं. पैसे दिले नाही तर कारवाई करणार असं शशांकने म्हटलं होतं. त्यानंतर शशांकने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. शशांकने व्हिडीओसह मंदार देवस्थळी यांच्याबरोबरचे चॅट्सचे काही स्क्रिनशॉट्सही शेअर केलेत.
शशांकने पोस्टमध्ये लिहिलंय, "मी legal action घेतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी ( मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा या साठी हा video screenshots सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो."
advertisement
"5,00,000 ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे पर डे प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यानी पेमेंट देताना TDS कापला आणि गव्हरमेन्टला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे."
शशांकने पुढे लिहिलंय, "बर ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही…. सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्यासाठी बोलतो आहे. YouTube वर ४ वर्षपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न क्लिअर दिसतो. आणि आमच्या पैसाच केलं काय या बद्दल चकार शब्द काढत नाही तो."
"असो, या पुढचा video बाकी सगळ्या legal details सकट असेल लवकरच… याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा टीममधला कोणीही जबाबदार नसेल. इथे हे आवर्जून सांगाव लागेल सगळेच निर्माते असे फ्रॉड अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त मंदार देवस्थळी याच्याबद्दल आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. आम्ही उत्तम काम करून तुमच प्रोजेक्ट चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमच काम उत्तम करा!"
