शिल्पा शेट्टीने डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,"फॅन तर मिळाला नाही. पण मी फॅन झाले आहे. त्यामुळे हा ट्रेंड फॉलो करणं तर बनतंच. रणवीर सिंह तुझी वेळ आली आहे. तू तुझी भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली आहे. अक्षय खन्नाचा ऑरा कमाल आहे. आर. माधवन, या भूमिकेसाठी तुमच्यापेक्षा योग्य दुसरा कोणीच नव्हता. संजय दत्त नेहमीप्रमाणे रॉकस्टार आहेत आणि अर्जुन रामपालपण जबरदस्त आहे".
advertisement
शिल्पाने चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांचंही मनापासून कौतुक केलं असून त्यांना खरा व्हिजनरी म्हटलं आहे. तिने धुरंधरच्या संपूर्ण टीमला या शानदार सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. चाहत्यांनीही शिल्पाच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. 'धुरंधर'मधील हे गाणं सध्या सतत चर्चेत असून सोशल मीडियावर यावर अनेक ट्रेंड्स सुरू आहेत. लोक या गाण्यावर रील्स बनवत आहेत आणि मीम्सचाही अक्षरशः पाऊस पडतोय.
शिल्पाच्या फिल्मची प्रेक्षकांना प्रतीक्षा
शिल्पा शेट्टीला गेल्या काही दिवसांत एकदा मोठा सिनेमा मिळालेला नाही. मात्र टीव्ही आणि ओटीटीच्या दुनियेत ती सातत्याने काम करताना दिसते. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या इंडियन पोलिस फोर्स या सीरिजमध्ये शिल्पाने मुख्य भूमिका साकारली होती, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राही तिच्यासोबत दिसला होता. यानंतर तिने खिलाडी 1080 या चित्रपटातही काम केलं. 2021 मध्ये आलेल्या हंगामा-2 मध्येही शिल्पा झळकली होती. त्यानंतर ती चांगल्या कथा आणि चित्रपटांच्या शोधात आहे. IMDb नुसार शिल्पा लवकरच KD: द डेव्हिल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, शिल्पा सातत्याने डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून सहभागी होत असते आणि ती खूप लोकप्रियही आहे. तसेच बॉलिवूड पार्ट्यांमध्येही शिल्पा अनेकदा झळकताना दिसते.
