TRENDING:

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पाच तास कसून चौकशी; कारण काय?

Last Updated:

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण चित्रपट नव्हे तर एक मोठं आर्थिक प्रकरण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण चित्रपट नव्हे तर एक मोठं आर्थिक प्रकरण आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा शेट्टीची तब्बल पाच तास चौकशी केली.
शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ
शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ
advertisement

ही चौकशी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. तक्रारदार दीपक कोठारी, लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक, यांनी दावा केला आहे की 2015 ते 2023 दरम्यान शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी त्यांची मोठी रक्कम फसवणुकीने घेतली.

गोलानंतर आता कोण येणार? Bharti Singh ने दुसऱ्यांदा दिली गुडन्यूज; बेबी बंपसोबत शेअर केला फोटो

advertisement

कोठारी यांच्या मते, शिल्पा शेट्टीने 2015 मध्ये 75 कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. मात्र, कर्जाऐवजी त्यांनी ते पैसे गुंतवणूक म्हणून घेण्याची सूचना केली. त्यानुसार, कोठारी यांनी दोन टप्प्यांमध्ये जवळपास 60 कोटी रुपये दिले. एप्रिलमध्ये 31.95 कोटी आणि सप्टेंबरमध्ये 28.53 कोटी.

कोठारींचा आरोप आहे की या जोडप्याने व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, पण ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले. अनेक वेळा पैसे परत मागूनही रक्कम मिळाली नाही, म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह पाच जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. सप्टेंबरमध्ये EOW ने शिल्पा आणि राजविरुद्ध लूकआउट सर्क्युलरही जारी केले होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि तिचे वकील प्रशांत पाटील यांनी हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, 'आम्ही कायद्याचा आदर करतो आणि तपास संस्थांसमोर आमचं सत्य मांडू.'

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पाच तास कसून चौकशी; कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल