राहुल आणि श्रद्धाच्या नव्या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला असून अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या मूव्ही डेटचा आहे. थिएटरमधून बाहेर आल्यानंतर श्रद्धा कारजवळ जाते आणि प्रेमाने राहुलच्या गालावर थाप देते. त्यानंतर राहुल श्रद्धाची मान हलक्या हाताने पकडतो आणि तिला कारमध्ये बसवतो. काहींना हे खूप प्रेमळ वाटले, तर काहींनी याला गैरसमज करून "उद्धट वागणूक" असे म्हटले.
advertisement
ओटीटीची बोल्ड अभिनेत्री, कॅमेऱ्यासमोर दिले इंटीमेट सीन; ओलांडल्या मर्यादा
एका वापरकर्त्याने लिहिले, "ही काय स्टाईल आहे? असं कुणी मुलीशी वागतं का?" तर दुसऱ्याने मजेत म्हटलं, "शक्ती कपूरच्या मुलीशी असं वागायचं? त्याचे सिनेमे पाहिलेले नाहीत बहुतेक." मात्र काहींनी राहुलची बाजू घेत सांगितलं की हा हावभाव चुकीचा समजला जात आहे.
श्रद्धा आणि राहुल गेल्या वर्षभरापासून एकत्र दिसत आहेत. 2024 च्या सुरुवातीला डिनर डेटनंतर ते दोघे मुंबईत एका रेस्टॉरंटबाहेर दिसले होते. त्यानंतर ते अनंत अंबानी–राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांपासून ते अनेक चित्रपटांच्या स्क्रीनिंगपर्यंत एकत्र दिसले. दोघेही सतत एकत्र स्पॉट होत असले तरी अद्याप दोघांनीही या नात्याला अधिकृत केलेलं नाहीये.
श्रद्धाची "स्त्री 2" सुपरहिट ठरली. या हॉरर-कॉमेडीने जागतिक स्तरावर तब्बल 857 कोटींची कमाई केली. आता ती निखिल द्विवेदीच्या "नागिन" मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.