श्रेयस गुरुवारी सकाळी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. दिवसभर काम आटोपल्यानंतर तो घरी आला होता. घरी येताच श्रेयसने पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. पत्नीने नेमकं काय होतंय विचारल्यावर त्याला काहीच सांगता आलं नाही. त्यानंतर अचानक प्रकृती जास्तच बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयसवर एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आल्याची माहिती समजते. त्याची प्रकृती आता ठीक असल्याचंही सांगण्यात येत आहे.
advertisement
श्रेयस तळपदे सध्या वेलकम ३ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच अक्षय कुमारने या चित्रपटाच्या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत अक्षय कुमार चित्रपटातील कलाकारांसोबत दंगामस्ती करताना दिसत आहेत. श्रेयस तळपदेसुद्धा यामध्ये दिसतोय. श्रेयस तळपदेने विनोदी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. गोलमाल चित्रपटात आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.