गौरवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये श्रृती मराठी चक्क हातात ग्लोव्हज घालून जेवताना दिसतेय. गौरवने गुपचूप श्रृतीचा व्हिडीओ शूट केला आहे. श्रृती ग्लोव्हज घालून का जेवतेय हे सांगत त्याने तिची चांगलीच पोलखोल केली आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये श्रृती डायनिंग टेबलावर बसून शांतपणे जेवतेय. तिने हातात ग्लोव्हज घातले आहेत. गौरव तिचा व्हिडीओ शूट करतोय याची तिला कल्पना देखील नाहीये. गौरव व्हिडीओमध्ये म्हणतोय, "हे बघा, श्रृती ताई आज ग्लव्स घालून जेवत आहेत. कारण आज त्या नेल जॉब करून आल्यात. मग आज घरी जेवायला होती भेंडीची भाजी आणि भाकरी. तर ग्लव्स घालूनच तिने हात धुतला आणि जेवायला बसली. कारण जर त्याला हळद लागली तर आज तिने जो केलेला नेल जॉब होता तो खराब झाला असता म्हणून..."
श्रृती मराठेनं नुकतंच नेल आर्ट केलं होतं. इतकं महागडं नेल आर्ट खराब होऊ नये म्हणून तिने थेट हातात ग्लोव्हज घातलेत. अभिनेत्री होणं काही सोपं नाही. फक्त अभिनयच नाही तर अभिनेत्रींना त्यांच्या बाकीच्या गोष्टीही सांभाळाव्या लागतात. मग ते स्किन केअर असो, हेअर केअर असो, चांगलं दिसणं असो किंवा चांगले कपडे घालणं असो. अभिनेत्रींना या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. आता नेल आर्ट सांभाळण्यासाठी श्रृती ग्लोव्हज घालून जेवायचं ठरवलं.
"नेल्स अपॉइंटमेंटनंतर तुमची नखं वाचवणं..." असं कॅप्शन देत गौरवने श्रृतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर श्रृती कमेंट करत गौरवलाच प्रश्न विचारला आहे. तिने लिहिलंय, "मला दोन प्रश्न विचारायचे आहेत, एक म्हणते ताई काय आहे? दुसरा नेल जॉब काय आहे?" त्यानंतर श्रृतीने आणखी एक कमेंट करत "तू मेलास" असं लिहित अँग्री इमोजी देखील पोस्ट केलेत.
