पलाशची आई काय म्हणालेली?
पलाशची आई मीडियासोबत बोलताना म्हणालेली,"स्मृती मानधना आणि पलाश दोघंही सध्या कठीण काळातून जात आहेत. पलाशने आपल्या पत्नीबरोबर घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मीदेखील स्मृतीच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सगळं ठीक होईल, असा विश्वास पलाशच्या आईने व्यक्त केला होता. तसेच लवकरच दोघाचं लग्न होईल, असंही त्या म्हणाल्या होत्या.
advertisement
स्मृतीने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे सर्व फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हटवले होते. त्यामुळे त्यांचं लग्न मोडलं असल्याची चिंता चाहत्यांकडून व्यक्त केली होती. आता स्मृतीने थेट जाहीर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
स्मृतीची चाहत्यांना विनंती
पलाशसोबतचा विषय स्मृतीने संपवला असून तिने चाहत्यांनाही हा विषय संपवण्याची विनंती आपल्या पोस्टमध्ये केली आहे. स्मृती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे,"मी एक खाजगी व्यक्ती आहे. पण मला माझं लग्न रद्द झाल्याचं स्पष्ट करणं आवश्यक आहे. हा विषय मी इथेच संपवते आणि तुम्हालाही हा विषय संपवण्याची विनंती करते. कृपया आमच्या कुटुंबियांच्या गोपनियतेचा आदर करा".
