आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोहा अली खान आहे. आजकाल करिअर, जीवनशैली आणि उशिरा होणाऱ्या लग्नामुळे अनेक महिला आई होण्याचा विचार पुढे ढकलतात. पण प्रश्न असा पडतो, एग्ज फ्रिजचे योग्य वय कोणते? आणि उशीर झाला तर काय होईल? याच विषयावर नुकताच अभिनेत्री सोहा अली खानने तिच्या पॉडकास्ट ऑल अबाउट हर मध्ये स्वतःचा अनुभव शेअर केला.
advertisement
गणेशोत्सवात हृताच्या घरी दुहेरी आनंद, घरी आली नवी पाहुणी; फोटो शेअर करत दिली GOOD News!
सोहा सांगते, जेव्हा ती 35 वर्षांची असताना एग्ज फ्रिजसाठी डॉक्टरांकडे गेली, तेव्हा डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दांत सांगितले, "तुम्ही खूप म्हातारे झाला आहात. तुमच्या अंडाशयांना तुमचा चेहरा दिसत नाही!" हा धक्का सोहासाठी मोठा होता. कारण त्या काळात लोक तिला तरुण समजत होते, पण वैद्यकीय भाषेत तिची प्रजनन क्षमता कमी होत चालली होती.
या चर्चेत सनी लिओनीनेही भाग घेतला. तिने सांगितले की ती स्वतः गर्भवती राहिली नाही आणि सरोगसीच्या मदतीने आई बनली. त्याशिवाय तिने निशा नावाची मुलगी दत्तक घेऊन कुटुंब पूर्ण केलं.
दरम्यान, चेहरा कितीही तरुण दिसला तरी अंडाशयांचे वय वेगळं असतं. त्यामुळे ज्यांना करिअर किंवा वैयक्तिक कारणांमुळे आई होण्याचा निर्णय पुढे ढकलायचा आहे, त्यांनी योग्य वेळी नियोजन करणं गरजेचं आहे.