TRENDING:

Pune : ‘असा नट होणे नाही’ शेतकरी जेव्हा रंगमंचावर उभा राहिला!

Last Updated:

शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करणारा ध्येयवेडा शेतकरी नटसम्राट मुळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे: एक शेतकरी कलाकार शेतीसोबतच आपला छंद जोपासत आहे. वृध्द माणसांची होत असलेली अवहेलना आपल्या कलेतून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत. शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करणारा ध्येयवेडा शेतकरी नटसम्राट मुळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. फुलचंद नागटिळक असं त्यांचं नाव असून ग्रामीण भागातील याच नटसम्राटाविषयी आपण जाणून घेणार आहोत.

advertisement

गाडगे बाबांच्या वेशभुषेनं वेधलं लक्ष

पुण्यात होत असलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील नाट्यदिंडीत संत गाडगे बाबाची वेशभूषा आणि नटसम्राट या एकपात्री प्रयोगाने सर्वांनाच आकर्षित केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराबगावात फुलचंद नागटिळक शेतीचा व्यवसाय करतात. शेतीसोबत अभियनाची कला जोपसण्याचे काम ते करत आहेत. कुसुमाग्रजांचे नटसम्राट आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. अलीकडे नाना पाटेकरांनी साकारलेल्या नटसम्राटाला रसिकांनी डोक्यावर घेतले होते. मात्र प्रत्येक खेडी, गाव वाडी वस्तीवर नटसम्राट पोहोचवण्याचे काम नागटिळक अविरतपणे करत आहेत. आप्पासाहेब बेलवलकरांसोबत सहा व्यक्तिरेखा एकाच वेळी साकारणाऱ्या नागटिळक यांचा नाट्यसम्राट अंगावर शहारे आणतो.

advertisement

View More

नटुन थटून नाट्य संमेलनाला आले, पण पत्ता सापडेना, चालले परत मुंबईला; अभिनेत्री संतापली

आतापर्यंत 4 हजार 270 प्रयोग

फुलचंद यांनी आतापर्यंत 4 हजार 270 प्रयोग सादर केल्यामुळे त्यांचे जीवनच जणू नटसम्राटमय झाले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी घरातून पळून जाऊन नागटिळक यांनी परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनामध्ये हजेरी लावली. तेथे कवी नारायण सुर्वेंची भेट घेतली. संमेलनात वन्हाडकार लक्ष्मण देशपांडे यांनी सहकाऱ्यासोबत द्विपात्री नटसम्राट सादर केले. त्याचवेळी नागटिळक यांनी एकपात्री प्रयोग करण्याचा निश्चय केला. त्यांना सातत्याने मोठा प्रतिसाद मिळत आहे, तो आजपर्यंत तसाच असल्याची भावना नागटिळक यांनी व्यक्त केली.

advertisement

पुण्यात नाट्यप्रेमींसाठी पर्वणी, पाहा शतक महोत्सवी संमेलनात कलाकारांच्या भावना, Video

फुलचंद यांच्या नटसम्राटचे वैशिष्ट्य

फुलचंद नागटिळक यांच्या नटसम्राटाचे वैशिष्ट्ये म्हणजे आप्पासाहेब बेलवलकरांसोबत त्यांची सहचारिणी कावेरी, नात ढमी, सून शारदा, नोकर विठोबा, मुलगी नलू या सहा व्यक्तिरेखा ते एकाच वेळी साकारतात. त्यांच्या या एकपात्री प्रयोगातून संपूर्ण कथा अलगद उलगडते. नागटिळकांनी या सादर केलेल्या व्यक्तिरेखांचे गारुड प्रेक्षकांच्या मनात कितीतरी वेळ रंजी घालत राहतं. त्यांना विचार करायतला लावत. तारुणामध्ये मिळवलेल्या मिळकतीची किंमत. जपलेले नाती याचे मोल काय असते याचा उलगडा झाल्याशिवाय राहत नाही. माणूस जोपर्यंत तरुण आहे, त्याच्याकडे मिळकतीचे साधन आहे. तोपर्यंतच त्याची कुटुंबांत किंमत आहे. वृध्द माणसाची कुटुंबांतच कशी अहवेलना होते यावर या नटसम्राटाने भाष्य केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Pune : ‘असा नट होणे नाही’ शेतकरी जेव्हा रंगमंचावर उभा राहिला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल