दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवर मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र दिसले. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर पुन्हा जुन्या चर्चाना उधाण आले. एएनआय ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने याविषयी स्पष्ट मत मांडले.
'आईवडिलांचं पटत नाही, फक्त दाखवायचं नीट चाललंय', लग्नाविषयी काय बोलली मधुराणी? थेटच केला हल्लाबोल
advertisement
राज ठाकरेंसोबत व्हिडिओवर काय म्हणाली सोनाली?
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सोनाली बेंद्रे म्हणाली, "लोक काहीही बोलतात. पण अशा गोष्टी केवळ कलाकारांपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यात कुटुंबही ओढले जाते, जे दुःखद आहे."
तिने स्पष्ट सांगितले की, "ठाकरे कुटुंबाशी आमचे जुने कौटुंबिक नाते आहे. माझ्या आईची मावशी म्हणजे शर्मिला ठाकरे यांची आई. त्यांनी मला 10 दिवस त्यांच्या घरी ठेवले होते. त्या आमच्या घरच्यांसारख्याच होत्या. राज ठाकरे यांच्याशी आमचे कोणतेही वेगळे नाते नाही."
दरम्यान, राज ठाकरेंच्या व्हायरल व्हिडीओवर सोनाली बेंद्रे म्हणाली की, ती त्या कार्यक्रमात आपल्या बहिणीसोबत उभी होती आणि तिच्याशीच बोलत होती. सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवा खऱ्याच्या फार लांब असतात.
