अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक सुबोध भावे आता आणखी एका नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या नव्या पोस्टने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमधून त्यांनी आगामी कामाची मोठी हिंट दिली असून अभिनेत्री तेजश्री प्रधानलाही टॅग केलं आहे.
मराठीचा सुपरस्टार आता बॉलिवूडमध्ये दिसणार, साकारणार तुकाराम महाराजांची भूमिका
सुबोध भावे पोस्ट
advertisement
सुबोध भावेंनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी लिहिलं, "होणार सून 'ती' ह्या घरची". यासोबत त्यांनी लिहिलं, लवकर...आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानला टॅग केलं आहे. त्यामुळे तेजश्रीच्या जुन्या मालिकेचा नवा भाग येणार असल्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
दरम्यान, 2013 झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका लागायची. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेच्या प्रचंड प्रतिसादानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची हिंट सुबोध भावेच्या पोस्टमधून लागत आहे. मात्र हा नेमका सिनेमा असणार आहे की मूव्ही? याबाबात अद्याप काही स्पष्टता नाही. मात्र या पोस्टने ‘होणार सून मी या घरची’चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
‘होणार सून मी या घरची’ मालिकेत तेजश्री प्रधान (जान्हवी) आणि शशांक केतकर (श्रीरंग/श्री) यांच्या केमिस्ट्रीने या मालिकेने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक पार केले. साध्या, सोज्वळ आणि कर्तव्यदक्ष जान्हवीची श्रीरंगशी झालेली ओळख, त्यातून निर्माण झालेलं प्रेम, लग्न आणि नंतर तिचं सहा-सासवांच्या घरात सून म्हणून जुळवून घेतलेलं नातं, हे सर्व प्रेक्षकांना खूप भावलं. या मालिकेतील प्रसंग, गाणी, आणि संवाद अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतात.