Subodh Bhave: मराठीचा सुपरस्टार आता बॉलिवूडमध्ये दिसणार, साकारणार तुकाराम महाराजांची भूमिका
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Subodh Bhave: सुबोध भावेंच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. सुबोध भावे बॉलिवूडमध्ये भूमिका साकारणार आहे. तेही लीड रोलमध्ये.
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगभूमीवर आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे, अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखांना जिवंत करणारे अष्टपैलू अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक म्हणजे सुबोध भावे. सुबोध भावेंच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. सुबोध भावे बॉलिवूडमध्ये भूमिका साकारणार आहे. तेही लीड रोलमध्ये. त्यामुळे सुबोध भावे आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी गुडन्यूज आहे.
संत तुकाराम यांचं जीवन, त्यांची भक्ती, त्यांचे अभंग आणि सामाजिक विचार आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. 17व्या शतकातील या महान संत-कवीचं प्रेरणादायी आयुष्य ‘संत तुकाराम’ या भव्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि संत तुकाराम महाराजांची ही भूमिका सुबोध भावे साकारणार आहेत.
advertisement
हा चित्रपट 18 जुलै 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून, त्यात संत तुकारामांची भूमिका मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे साकारणार आहे. त्यांनी 'लोकमान्य टिळक', 'बालगंधर्व' यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधून आधीच आपली वेगळी छाप पाडली आहे. आता तुकारामांसारखा पवित्र, शांत, पण अंतर्मुख योद्धा साकारणं हेही त्यांच्या करिअरमधील मोठं टप्पा ठरणार आहे.
advertisement
चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केलं असून, निर्मिती बी. गौतम यांच्या कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओजने केली आहे. चित्रपटात तगडे कलाकारही आहेत. शिव सूर्यवंशी, शीना चोहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, मुकेश खन्ना, हेमंत पांडे, गणेश यादव, रूपाली जाधव आणि इतर अनेक अनुभवी कलाकार. विशेष म्हणजे, मुकेश खन्ना या चित्रपटात सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहेत. त्यांच्या आवाजातून संत तुकारामांचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 1:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Subodh Bhave: मराठीचा सुपरस्टार आता बॉलिवूडमध्ये दिसणार, साकारणार तुकाराम महाराजांची भूमिका