गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पहायचं होतं त्या शालिनी शिर्के-पाटीलची लवकरच मालिकेत एण्ट्री होणार आहे. जयदीप-गौरीसोबत शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास 25 वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परत येणार आहे. अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनीच्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
नवा प्रोमो समोर आला असून शालिनीचं रूप पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळालाही. शालिनीने 25 वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या रहाणीमानात बरेच बदल झाले आहेत. इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं आहे. मात्र आता शालिनी मॉडर्न अंदाजात दिसणार आहे. प्रेक्षकांना मात्र मालिकेचा हा ट्विस्ट फारसा आवडलेला नाही.
मालिकेच्या या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्याची खिल्ली उडवली आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोवर, 'शालिनी च्या तारुण्याचं रहस्य नक्की काय असतं?', '25 वर्षांनंतरही ती एवढी तरुण कशी?, '25 वर्षात ही म्हातारी नाही का झाली?', 'शालिनीचाही पुर्नजन्म झालाय का?' अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी यावर दिल्या आहेत. 25 वर्षांनंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुडाची आग धगधगतेय हे लवकरच कळेल.
मालिकेत आता पुढे काय घडणार, शालिनीच्या समोर तिचा भूतकाळ कसा उभा राहणार, शालिनी नित्या अधिराजला पाहिल्यावर काय प्रतिक्रिया देणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. पण काही प्रेक्षकांनी शालिनीला पाहताच मालिकेच्या पुढच्या भागांविषयी उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे प्रेक्षक आता मालिकेच्या या आगामी भागांना कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.