TRENDING:

Govinda- Sunita Relation: "मामाची वाट लावली आहे, आता माझीही...", गोविंदाच्या भाच्याने घरातलं पितळ सर्वांसमोरच उघडं केलं

Last Updated:

अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता अहुजा गेल्या काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेणार अशी चर्चा सुरू होती. आता अशातच गोविंदाच्या भाच्याने विनय आर. आनंद याने पुन्हा एकदा गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार अशी चर्चा सुरू होती. परंतू दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आवर घालत आमच्यामध्ये सर्व काही आलबेल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्ये मध्ये त्यांच्या घटस्फोटाची चर्चा माध्यमांवर होताना पाहायला मिळते. आता अशातच गोविंदाच्या भाच्याने विनय आर. आनंद याने पुन्हा एकदा गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे.
Govinda- Sunita Relation: "मामाची वाट लावली आहे, आता माझीही...", गोविंदाच्या भाच्याने घरातलं पितळ सर्वांसमोरच उघडं केलं
Govinda- Sunita Relation: "मामाची वाट लावली आहे, आता माझीही...", गोविंदाच्या भाच्याने घरातलं पितळ सर्वांसमोरच उघडं केलं
advertisement

एका मुलाखतीमध्ये विनय आर. आनंद म्हणालाय की, "मी नेहमीच माझा मामा गोंविदा याच्या संपर्कात आहे. अलीकडेच मी त्यांना भेटलो सुद्धा आहे. शिवाय, मी मामी सुनीतासोबतही फोनवर बोलत असतो." पुढे विनय असंही म्हणाला की, "परंतू मीच आता मामीला घाबरतोय. जर त्यांनी माझ्या मामाची वाट लावली आहे, तर त्या माझी वाट लावायलाही कमी करणार नाही. जर मी काही बोललो तर माझीच अडचण होईल. कोण रिस्क घेणार आहे?" विनय आनंदने मामा- मामीच्या घटस्फोटाबद्दलही महत्त्वपूर्ण विधान केलंय, तो म्हणाला की, "देवाने असं नको करायला. जर एखादं नातं तुटण्याबद्दल आधीच ठरलेलं असेल, तर मग कुणीही काहीही करू शकत नाही. अजूनपर्यंत ते दोघे एकत्र आहेत. म्हणजेच देवाची इच्छा आहे की, काहीही वाईट घडू नये. मामांनी मला सांगितलं की हा त्यांचा कठीण काळ आहे. ते देवाकडे प्रार्थना करत आहेत की हा वाईट काळ दूर व्हावा."

advertisement

"मी मामाला विचारलं खरंच असं काही आहे का, तर त्यांनी मला नाही असं सांगितलं. आता मी हेही म्हणणार नाही की, माझी मामी चुकीची आहे. त्यांना काहीतरी जाणवलं असेल आणि आता त्यांना सर्व काही पटवून देणारेही फक्त मामाच आहेत. पण मला आशा आहे की दोघांमध्ये जे काही सुरू आहे ते लवकरच ठीक होईल. मामा- मामी चुकीचे नाहीत." असंही विनय म्हणाला. दरम्यान, विनय आनंद विषयी बोलायचं तर, विनय आनंद भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अलीकडेच त्याने एकता कपूरच्या 'एसीपी विक्रांत' वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 19 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर विनयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला 39 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी 11 मार्च 1989 साली लग्नगाठ बांधली होती. गोविंदा आणि सुनीताने कोणालाही न कळवता लग्नगाठ बांधली होती. त्यांना मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. लवकरच यशवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. साजिद खानच्या एका हॉरर चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. त्या चित्रपटात यशवर्धनची हिरोईन म्हणून 'लापता लेडीज'फेम नितांशी गोयल झळकणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda- Sunita Relation: "मामाची वाट लावली आहे, आता माझीही...", गोविंदाच्या भाच्याने घरातलं पितळ सर्वांसमोरच उघडं केलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल