सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली!
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठाने जॅकलीनची याचिका फेटाळून लावली. त्यांनी सांगितलं की, हे प्रकरण रद्द करता येणार नाही, कारण ट्रायल झाल्यावरच सत्य समोर येईल.
न्यायमूर्ती दत्ता म्हणाले, “जर एका मित्राने दुसऱ्या मित्राला काही दिलं आणि नंतर समजलं की तो गुन्हेगार आहे, तर अडचणी येतात. पण, हे प्रकरण केवळ भेटवस्तू घेतल्याचं नाहीये. जॅकलीनला सुकेशच्या गुन्ह्यांबद्दल माहिती होती, तरीही तिने त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या. तपासादरम्यान, तिने तिच्या फोनमधून माहिती डिलीट केली, ज्यामुळे तिचा सहभाग दिसून येतो.”
advertisement
जॅकलीनने काय आरोप केले होते?
जॅकलीनच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला होता की, जॅकलीनने सुकेशकडून घेतलेल्या भेटवस्तू तिला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नसताना मिळाल्या होत्या. पण, ईडीने तिच्यावर आरोप केला आहे की, तिला सुकेशबद्दल सगळं माहिती होतं आणि तरीही तिने त्याच्याकडून ७ कोटींपेक्षा जास्त किमतीचे दागिने, कपडे आणि महागड्या गाड्या घेतल्या. ईडीने सुकेशवर २१५ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सुकेश सध्या दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे.