TRENDING:

झापुक झुपूक 'बच्चा' येणार? सूरज चव्हाण बाबा होणार, प्रेग्नेंट संजनाचा पहिला VIDEO

Last Updated:

सूरज चव्हाण आणि संजना आई-वडिल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. संजनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण सध्या पुन्हा चर्चेत आहे.  सूरज लवकरच बाबा होणार अशा चर्चा सुरू आहेत. सूरज चव्हाणची बायको संजना चव्हाण प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. संजनाने स्वत: त्या आशयाची पोस्ट शेअर केली आहे. संजनाच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
News18
News18
advertisement

या चर्चांना कारण ठरली आहे त्याची पत्नी संजना चव्हाण हिची सोशल मीडियावरील पोस्ट. संजनाने नुकतंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये तिने नेसलेल्या साडीत तिचा बेबी बंप दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे या पोस्टला संजनाने लावलेलं गाणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

( Marathi Serial : 'मी जिंकून घेईन सारं' म्हणत छवीची एंट्री आणि एकाच वेळी 5 अभिनेत्रींची एक्झिट )

advertisement

याच फोटोसोबत संजनाने एक ऑडिओही शेअर केला आहे. या ऑडिओमध्ये ती म्हणते, "अजून तू माझ्या पोटात आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक हालचालीला ओळखते. तू हललास की वाटतं आयुष्य हलकं झालं. आता फक्त तुझी वाट बघतेय. तुझ्या त्या पहिल्या श्वासासाठी आणि त्या छोट्याशा हसण्यासाठी माझं संपूर्ण जग तुझ्यात बसलेलं आहे बाळा."

advertisement

या शब्दांमधून ती आई होण्यार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनेक डोहाळे जेवणाच्या व्हिडीओला हे गाणं ऐकायला मिळतं. संजना तिच्या बाळाच्या आगमनासाठी आतूर असल्याचं तिच्या पोस्टमधून कळत आहे.  चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर सध्या सूरज आणि संजना आई-बाबा होणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सूरज आणि संजना यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यात त्यांच्या घरी पाळणा हलणार आहेत. सूरज आणि संजना एकत्र येऊन ही गुड न्यूज कधी शेअर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

संजना ही सूरज चव्हाणच्या मामाची मुलगी आहे. लग्नानंतर दोघे त्यांच्या नव्या घरात राहत आहेत. दोघांचा सुखी संसार सुरू आहे. दोघे सोशल मीडियावर रोमँटिक गाण्यांवर रील व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

मराठी बातम्या/मनोरंजन/
झापुक झुपूक 'बच्चा' येणार? सूरज चव्हाण बाबा होणार, प्रेग्नेंट संजनाचा पहिला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल