हिंदुस्तान टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, CBI ने आपल्या क्लोजर अहवालात म्हटले आहे की रिया चक्रवर्तीने सुशांतला बेकायदेशीरपणे कैद करून ठेवले, धमकावले, आत्महत्येस प्रवृत्त केले किंवा त्याचे पैसे आणि मालमत्ता बेकायदेशीररीत्या हस्तगत केली, याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. मात्र सुशांतचे कुटुंब आणि त्यांचे वकील वरुण सिंग यांनी हा अहवाल अपूर्ण असल्याचे सांगत त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. वकील वरुण सिंह यांनी म्हटले की हा अहवाल फक्त दिखावा आहे. जर सीबीआयला खरेच सत्य समोर आणायचे असते, तर चॅट, तांत्रिक नोंदी, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय नोंदी असे सर्व दस्तऐवज न्यायालयात सादर केले गेले असते, परंतु तसे झाले नाही.
advertisement
लपवूनी लपलेच नाही...! पूजा बिरारीचा फॅमिली फोटो, सोहम बांदेकरला रहावलं नाही; केली अशी कमेन्ट, वेधलं सगळ्यांचं लक्ष
सुशांतच्या कुटुंबियांचा मोठा निर्णय
वरवरच्या तपासावर आधारित क्लोजर अहवालाविरुद्ध विरोध याचिका दाखल करण्याची तयारी सुशांतच्या कुटुंबियांनी सुरू केली आहे. हा तपास देशातील सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांपैकी एक राहिला आहे. सीबीआयच्या मुख्य क्लोजर अहवालात तपासादरम्यान सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं आहे. हा अहवाल रिया, तिचे आई-वडील इंद्रजीत आणि संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक, सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी आणि हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्याशी संबंधित आहे.
अहवालानुसार, 8 ते 14 जून 2020 दरम्यान सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याच्यासोबत कोणताही आरोपी नव्हता. रिया आणि शोविक 8 जून रोजी घर सोडून गेले आणि नंतर परत आले नाहीत. 10 जूनला सुशांतने शोविकशी व्हॉट्सअॅपवर संवाद साधला होता, परंतु 8 ते 14 जूनदरम्यान रियाशी त्यांचा कोणताही संपर्क झाला नव्हता. श्रुति मोदीने फेब्रुवारी महिन्यात पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर सुशांतच्या घरी जाणं बंद केलं होतं. सुशांतची बहीण मीतू सिंह 8 ते 12 जूनदरम्यान त्याच्यासोबत होती. अहवालात म्हटले आहे की रिया किंवा तिच्या कुटुंबीयांची सुशांतशी भेट किंवा संपर्क याचा कोणताही पुरावा आढळला नाही. कुटुंबाचे म्हणणे आहे की हा तपास अपूर्ण आहे.