स्वप्निल जोशी पुन्हा एकदा देवाच्या रुपात
चित्रपटात स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम देवाची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी स्वप्निलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता ‘प्रेमाची गोष्ट २’मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय. सतीश राजवाडे यांचं जादुई दिग्दर्शन, रोमँटिक कहाणीची जादू आणि या जोडीची खास उपस्थिती, हे सगळं मिळून ‘प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांसाठी दिवाळीतील सर्वात सुंदर सिनेमॅटिक गिफ्ट ठरणार आहे.
advertisement
‘प्रेमाची गोष्ट 2’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!
सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य यांच्या मनमोहक केमिस्ट्रीची जादू पाहायला मिळत आहे. दोघांच्या रोमँटिक अंदाजात पुन्हा एकदा हे सुंदर गाणं अनोख्या स्वरूपात अनुभवायला मिळेल. ‘ओल्या साजंवेळी’ या गाण्याला काविर आणि बेला शेंडे यांचे मोहक स्वर लाभले आहेत. अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांचे गीत व अविनाश-विश्वजीत यांच्या कमाल संगीताने या गाण्यात रंगत आली आहे. एका नव्या धाटणीचा, तरीही तितकाच गोडवा जपणारा हा संगीत अनुभव प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.