स्वप्निल जोशीने आयफोनसोबतचा फोटो शेअर करत खास कॅप्शनही लिहिलं आहे. स्वप्निलने लिहिलं आहे,"ओ...रेंज...हाय!!!". इट्स दॅट टाईम ऑफ द इयर अगेन Iphone17promax #cosmicorange".
स्वप्निल जोशीच्या फोटोवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. व्हा काय रंग, कडक, अभिनंदन, खूप छान, ये भगवा रंग, तुझ्या नव्या व्हिडीओसाठी नवा फोन वाट पाहतोय, जय महाराष्ट्र, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
advertisement
बर्थडे शबानाचा पण रेखाने चोरली लाइमलाइट, माधुरी-उर्मिलाही पडल्या फिक्या, Inside Video व्हायरल
9 सप्टेंबरला iPhone 17 लाँच करण्यात आला होता. तर आजपासून या सीरिजची पहिली विक्री सुरू झाली आहे. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी आयफोनप्रेमींनी Apple स्टोअरबाहेर तुडुंब गर्दी केली आहे. काही ठिकाणी तुफान हाणामारी झालेलीदेखील पाहायला मिळाली. यासगळ्यात अभिनेता स्वप्नील जोशीने iPhone 17 सीरिजमधील कॉस्मिक ऑरेंज रंगाचा फोन खरेदी केला आहे. हा आकर्षक रंगाचा फोन प्री-ऑर्डर दरम्यान आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या या रंगाचा फोन स्वप्नीलला मिळाला असल्याने चाहत्यांना आणि आयफोनप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे.
स्वप्नील जोशीने किती किंमतीचा फोन घेतलाय?
स्वप्नील जोशीने iPhone 17 Pro Max घेतला आहे. आयफोन 17 प्रो मॅक्सच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत ₹1,49,900, 512 जीबी व्हेरिएंटची किंमत ₹1, 69,900, 1 टीबी व्हेरिएंटची किंमत ₹1,89,900 आणि 2 टीबी व्हेरिएंटची किंमत ₹2,29,900 आहे. एकंदरीत स्वप्नीलने घेतलेल्या फोनची किंमत दोन लाखांच्या आसपास आहे.