प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय?
प्राजक्ताच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचं नावही शंभूराज आहे.
या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या ब्लाऊजवर खास 'शंभूराज' असं लिहिलेलं आहे. तर तिचा होणारा पती पांढऱ्या रंगाच्या जोधपुरी सूटमध्ये आहे आणि त्याच्या कोटवर 'प्राजक्ता' असं लिहिलेलं आहे. त्या दोघांनीही त्यांच्या या पेहरावातून एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.
advertisement
'खालिद का शिवाजी' चित्रपट प्रदर्शित होणार नाही! वाद विकोपाला, सेन्सॉर बोर्डाने पाठवली नोटीस
मालिकेतली 'येसूबाई' आता खऱ्या आयुष्यात 'शंभूराज'ची राणी!
प्राजक्ता गायकवाडने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका इतकी अप्रतिम साकारली होती की ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता खऱ्या आयुष्यातही तिच्या आयुष्यात 'शंभूराज'ची एंट्री झाल्यामुळे ही गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे.
प्राजक्ताने आतापर्यंत 'नांदा सौख्य भरे', 'संत तुकाराम', 'आई माझी काळुबाई' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ती तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.
