TRENDING:

Shravan Month: श्रावणातील उपवास मटण खाऊन सोडला, अभिनेत्रीने शेअर केला VIDEO, नेटकऱ्यांनी घेतलं धारेवर

Last Updated:

Shravan Month: सध्या श्रावण महिना सुरु असून या महिन्याला पवित्र महिना मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात नॉन-व्हेज खात नाहीत. मात्र अभिनेत्रीच्या नॉन-व्हेजच्या व्हिडीओमुळे नेटकरी संतापले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या श्रावण महिना सुरु असून या महिन्याला पवित्र महिना मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात नॉन-व्हेज खात नाहीत. मात्र तनुश्रीने उपवास केल्यानंतर मटण खाल्ल्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होते आहे.
श्रावणातील उपवास मटण खाऊन सोडला
श्रावणातील उपवास मटण खाऊन सोडला
advertisement

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तनुश्री दत्ता बरीच चर्चेत आहे. तिने काही दिवसांपूर्वी रडत रडत एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये ती म्हणाली, 'तिच्या घरात तिचा छळ होतोय, कोणी तरी तिच्यावर लक्ष ठेवत आहे. मला मदतीची गरज आहे, मी आाजारी पडलीय, घरात कामाला कोणाला ठेवू शकत नाही, त्यांचा खूप वाईट अनुभव मला आला आहे.' यासोबतच तिने अभिनेता सुशांत सिंग सारखी तिची हालत करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही केला. यानंतर आता तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यामुळे ती पुन्हा ट्रोलिंगच्या निशाण्यावर आली आहे.

advertisement

माधुरीसाठी वेडा झाला सुपरस्टार, तब्बल 73 वेळा पाहिला एकच सिनेमा, क्रेझ इतकी की अख्खं थिएटरच करायचा बुक

तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये ती म्हणाली की, "माझं अन्न माझ्यासाठी औषधासारखं आहे." तिने मटणाची चरबी वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये दाखवत त्याचे फायदे सांगितले. ती पुढे म्हणाली, "जर कोणी मानसिक आरोग्याशी झुंजत असेल, तर त्याने अन्नावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे."

advertisement

श्रावनच्या उपवासाच्या दिवशी तिने संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि नंतर स्वतःसाठी एक खास थाळी तयार केली. काळी डाळ, मटण आणि भात. ती म्हणते, "मी उपवास सोडताना मटण खाल्लं. सण साजरे करणे हे प्रत्येकाच्या संस्कृतीवर अवलंबून असते." जसेच पोस्ट व्हायरल झाली, लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी लिहिलं, “श्रावनमध्ये मांस? छान मॅडम!”, तर काहींनी तिला “शाकाहारी होण्याचा” सल्ला दिला. पण तनुश्रीही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. तिने उत्तर देताना लिहिलं, "बंगालमध्ये आम्ही उपवास फक्त संध्याकाळपर्यंत करतो आणि मग देवीला अर्पण केलेला भोग खातो. तो मटण असू शकतो. प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते. तुमचं मत आम्हाला लादू नका."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shravan Month: श्रावणातील उपवास मटण खाऊन सोडला, अभिनेत्रीने शेअर केला VIDEO, नेटकऱ्यांनी घेतलं धारेवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल