'तेहरान' या लोकप्रिय अॅपल टीव्ही मालिकेत सहभागी असलेल्या इस्रायली निर्मात्या दाना एडन यांचे ग्रीसमध्ये चौथ्या सीझनचे शूटींग सुरू असताना अचानक निधन झाले. रविवारी अथेन्सच्या एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडल्याने मनोरंजन उद्योगाला धक्का बसला. नवीन सीझनच्या निर्मितीचे निरीक्षण करण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या. काय व्यवस्थित सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण काही तासात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि मनोरंजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
दाना एडन या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समर्पित आणि संवेदनशील निर्मात्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अचानक निधनामुळे जागतिक मनोरंजन उद्योगाचे मोठे नुकसान मानले जात आहे.
एडनच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही. इस्रायली माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनंतर, ग्रीक पोलिसांनी संभाव्य कारणांचा तपास सुरू केला. सुरुवातीच्या अहवालात असे सूचित केले आहे की हा आत्महत्येचा प्रकार होता. पण नेमकं कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, एडनला काही काळापूर्वी वैद्यकीय स्थितीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची औषधं सुरू होती.
मोसाद एजंटच्या कथेवर आधारित तेहरान या मालिकेत निव सुलतान, ग्लेन क्लोज आणि ह्यू लॉरी यांनी भूमिका केल्या होत्या. या मालिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली असली. इराणी सरकारने त्याचा प्रचार म्हणून निषेध केला.
